११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन पार्श्वभूमीवर ४ डिसेंबर रोजी साहित्यिकांची बैठक

साहित्यिकांना सहभागी होण्याचे
स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांचे आवाहन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
मराठवाडा साहित्य परिषद शाखा अंबाजोगाईच्या वतीने येत्या १४ व १५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले अंबाजोगाई साहित्य संमेलनात शहर व परिसरातील अधिकाधिक साहित्यिकांनी सहभागी व्हावे याचे आवाहन करण्यासाठी शहरातील सर्व साहित्यिक शिक्षक-प्राध्यापकांच्या एका व्यापक बैठकीचे आयोजन ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले असून या बैठकीस शहरातील सर्व साहित्यिक, शिक्षक-प्राध्यापकांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांनी केले आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने प्रति दोन वर्षी अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. लोकाश्रयावर आधारीत असलेले हे ११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन यावर्षी १४ व १५ डिसेंबर रोजी येथील नगर परिषदेच्या आद्यकवी मुकुंदराज स्वामी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलना पुर्वी शहरात साहित्यिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार,
मसाप शाखा अंबाजोगाई चे मार्गदर्शक अमर हबीब, अध्यक्ष दगडू लोमटे, सचीव गोरख शेंद्रे आणि
स्वागत समिती व मसापच्या सर्व पदाधिकारी यांच्या पुढाकाराने साहित्य संमेलनापुर्वी शहरात साहित्यिक उपक्रम राबविण्यात यावेत व साहित्य चळवळ अधिक गतीमान व्हावी यासाठी शहरात कथा लेखन कार्यशाळा, गझल लेखन कार्यशाळा, शिक्षक कवी संमेलन, व्यक्ती चित्रण लेखन स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यासर्व उपक्रमास शहरातील साहित्य प्रेमींनी भरभरुन प्रतिसाद दिला होता.
यासर्व उपक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर आता १४ व १५ डिसेंबर रोजी दोन दिवसीय अंबाजोगाई साहित्य संमेलनात शहर व परिसरातील सर्व साहित्यिक, शिक्षक-प्राध्यापकांनी सहभागी व्हावे व हे संमेलन ख-या अर्थाने गावचे बहुभाषिक संमेलन व्हावे यासाठी शहरातील सर्व साहित्यिक, शिक्षक-प्राध्यापक यांच्या व्यापक बैठकीचे आयोजन ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता नगर परिषदेच्या पत्रकार कक्ष सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
या बैठकीस ११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे सर्व स्वागत समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत ११वे अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी
शहरातील मान्यवर साहित्यिकांच्या प्रातिनिधिक स्वरुपातील सुचना समजावून घेवून हा उपक्रम लोकाभिमुख व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
११ वे अंबाजोगाई साहित्य संमेलन हे लोकाभिमुख व्हावे यासाठी मसाप शाखा अंबाजोगाई व साहित्य संमेलन स्वागत समितीच्या सर्व सदस्यांच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. या साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस शहरातील सर्व साहित्यिक, शिक्षक-प्राध्यापकांनी उपस्थित राहुन सहकार्य करावे असे आवाहन स्वागत समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, सचीव प्रा. पंडीत कराड, उपाध्यक्ष सुभाष बाहेती, मसाप शाखा अंबाजोगाई चे मार्गदर्शक अमर हबीब, अध्यक्ष दगडू लोमटे, सचीव गोरख शेंद्रे व दोन्ही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.