साहित्य संमेलनानिमित्त निघालेल्या जागर दिंडीतून झाला ज्येष्ठांचा सन्मान

अंबाजोगाई -: शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थित असलेल्या ज्येष्ठांना गुलाब पुष्प देवून स्वागत केले व ज्येष्ठांचा सन्मान केला. हा अनोखा उपक्रम ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या जागर दिंडीतून समाजाला दिशा देणारा ठरला.
११ व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शनिवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जागर दिंडी मुकुंदराज सभागृहाकडे निघाली. या जागर दिंडीचे उद्घाटन पुर्वस्वागताध्यक्ष डॉ.बी.आय.खडकभावी यांच्या उपस्थितीत झाले. या जागर दिंडीत ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही जागर दिंडी छत्रपती शिवाजी महाराज चौक, सावरकर चौक मार्गे सभागृहात पोहोंचली. सभागृहात शालेय विद्यार्थ्यांनी ज्येष्ठांनी गुलाब पुष्प देवून त्यांचा सन्मान केला. तर ज्येष्ठांनीही विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट देवून वाचन चळवळ रूजविली. या ग्रंथ दिंडीत घोडेस्वार विद्यार्थी, लेझीम पथक, गोंधळी, झांझपथक यांचा सहभाग होता. या जागर दिंडीत संमेलनाचे अध्यक्ष बालाजी सुतार, संमेलनाचे उद्घाटक डॉ.शिरीष खेडगीकर, स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार, मसापचे अध्यक्ष दगडु लोमटे, सचिव गोरख शेंद्रे, कार्यकारीणी सदस्य प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे प्रा.डॉ.शैलजा बरूरे, प्रा.देविदास खोडेवाड, डॉ.राहुल धाकडे, रेखा देशमुख, तीलोतमा पतकराव, निशा चौसाळकर, प्रा.विष्णु कावळे, स्वागत समितीचे सचिव प्रा.पंडीत कराड, उपाध्यक्ष सुभाष बाहेती, सदस्य वंदना तेलंग, विजय रापतवार, विष्णु सरवदे, सुजाता भोजने, सुनिल व्यवहारे, अश्रफ पठाण, दत्तात्रय आंबेकर, चंद्रकला देशमुख, विशाल जगताप, डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, एस.बी.सय्यद, मुजीब काझी, पद्माकर सेलमुकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थितीत होते.