पूस येथे स्वातंत्र्य दिनि विशेष वृक्षारोपण कार्यक्रम
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अष्टांग आयुर्वेद असोसिएशन, अंबाजोगाई यांच्या वतीने दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पुस येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. बालासाहेब लोमटे सर (तालुका आरोग्य अधिकारी अंबाजोगाई) अष्टांग आयुर्वेद असोसिएशन अंबाजोगाई चे अध्यक्ष डॉ. शशांक पाठक सर, सचिव डॉ.पांडुरंग बोंद्रे सर, सहसचिव डॉ.कमलाकर साखरे सर, तसेच असोसिएशनचे सदस्य डॉ.राहुल वरुडे सर, डॉ. देवराव चामनर सर,डॉ. श्रीराम काळे सर, डॉ. उमाकांत गाढवे सर, डॉ.अमोल बर्दापूरकर सर, डॉ. संदीप जैन सर, डॉ. मयूर काळेगावकर सर,डॉ. दीपक फुटाणे सर, डॉ. आशिष दरगड सर, शैलेंद्र देशपांडे सर, आरोग्य केंद्राच्या इन्चार्ज शिवकन्या तिडके मॅडम, आरोग्य केंद्राच्या आशाताई, पुस गावचे सरपंच श्रीराम (बापू)पवार, ग्रामपंचायत सदस्य त्रिंबक आप्पा गौरशेटे, गोविंद हाके, धनराज गायके कल्याण उदार, शुभम घोलप, शेखर गौरशेटे, तसेच गावातील अनेक ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.*
या उपक्रमाचा उद्देश केवळ पर्यावरण संरक्षण नव्हे, तर भविष्यासाठी आरोग्यदायी आणि हिरवेगार वातावरण निर्माण करणे हा होता.🌳💚
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात, निसर्गमित्र बनून प्रत्येकाने एक झाड लावूया…