ताज्या घडामोडी

श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक , युवा नेतृत्व संकेत मोदी यांचा जन्मदिन विविध कार्यक्रमानी साजरा

मतिमंद विद्यार्थ्यांना शाल वाटप, वृक्षारोपण, मंदिरात महाप्रसाद, शैक्षणिक साहित्य वाटपाचे आयोजन

Spread the love

अंबाजोगाई(प्रतिनिधी):- संकेत मोदी मित्र मंडळाच्या वतीने अंबाजोगाई शहराचे युवा नेतृत्व श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक संकेत राजकिशोर मोदी यांचा वाढदिवस मंगळवार रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. या दिवसाची सुरुवात अंबानगरीचे ग्रामदैवत माता श्री योगेश्वरी देवीची महाआरती करून करण्यात आली. त्यानंतर चनई येथील हजरत किरमानी बाबाच्या दर्ग्यावर चादर चढवण्यात आली. संघर्ष भूमी येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुधवंदना घेण्यात आली. त्यानंतर श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरात महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते.

संकेत राजकिशोर मोदी मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी मिळून या वाढदिवसाचे आयोजन केले होते. यामध्ये दत्ता सरवदे मित्र मंडळ यांच्या वतीने बोधवर्धिनी मतिमंद विद्यालयातील ७५ विद्यार्थ्यांना मोफत गरम शाल व अल्पोपहार वाटप करण्यात आला. यावेळी संकेत मोदी हे या मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत मिसळून गेल्याचे दिसून आले. या मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य व आनंद पाहून संकेत मोदी अतिशय भारावून गेले होते. याच विद्यालयात संकेत मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपन देखील करण्यात आले. संकेत भैय्या मित्र मंडळाचे रोहन कुरे, सुशील जोशी, जतीन कर्णावट व शरद काळे यांच्या वतीने श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले गेले होते. यावेळी ५०० च्या वर भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर संकेत मोदी यांनी अंबाजोगाई शहरात नुकत्याच उभारण्यात आलेल्या धर्मवीर संभाजीराजे यांच्या महाकाय पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

संकेत राजकिशोर मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त बोलावून राजू मोरे मित्र मंडळ, तानाजी देशमुख मित्र मंडळ, मुक्ताई मोबाईल शॉपी यांच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करून या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर महादेव आदमाणे, धम्मा सरवदे, दिनेश भराडीया, माणिक वडवणकर, खलील जाफरी, सचिन जाधव, शुभम लखेरा, दत्ता सरवदे, रोहन कुरे, अंकुश हेडे, आकाश कऱ्हाड, सुशील जोशी, शुभम लखेरा, रफिक गवळी, मतीन जरगर, अमजद पठाण, शाकेर काझी , विश्वजित शिंदे, गौरव कसबे, रोहित हुलगुंडे, यांच्यासह अनेक सहकार्यांनी संकेत मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.अंबानगरीचे युवा नेतृत्व संकेत मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक, श्री योगेश्वरी मल्टिस्टेट, श्री योगेश्वरी पतसंस्था, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला ना सह पतसंस्था, त्याचबरोबर श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रत्यक्ष भेटून संकेत मोदी यांना शुभेच्छा दिल्या. संपूर्ण दिवसभर अंबाजोगाई पंचक्रोशीतील सहकार क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, सामाजिक तथा राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा चा वर्षाव होत होता . मित्र मंडळ व शहरवासीयांचे प्रेम पाहून संकेत मोदी हे अतिशय आनंदाने प्रफुल्लित झाल्याचे दिसून येत होते. विविध सामाजिक उपक्रम राबवून अत्यंत अविस्मरणीय असा जन्मदिन अंबाजोगाई वासीयांनी साजरा केल्याबद्दल संकेत राजकिशोर मोदी यांनी संकेत मोदी मित्र मंडळ तसेच संपूर्ण अंबाजोगाई शहर वासीयांचे आभार व्यक्त केले असून यापुढेही मोदी कुटुंबावर असेच प्रेम व सहकार्य असू द्यावेत अशी भावना संकेत मोदी यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका