
अंबाजोगाई -:
बहुजन विकास मोर्चा, प्रहार संघटना,व लोकजनशक्ती पार्टी या तिन्ही पक्ष व संघटना यांनी गुरुवारी दुपारी केज विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे.
यावेळी बाबुराव पोटभरे यांनी मुंदडा कुटुंबाची मक्तेदारी,हुकूमशाही,एकाधिकार शाही मोडीत काढण्यासाठी आपला साठे यांना पाठिंबा असल्याचे सांगितले. केज मतदार संघात ३५०० कोटींची कामे झाली. मात्र यातील अनेक कामे कागदावरच असल्याचा आरोप पोटभरे यांनी केला.
यावेळी प्रहार चे फिरोज शेख,लोकजनशक्ती पार्टी चे राजेश वाहुळे यांनी आपला पाठींबा जाहीर केला. या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी,केजचे हारून इनामदार, माकप चे बब्रुवान पोटभरे, डॉ.नरेंद्र काळे, बबन लोमटे यांची उपस्थिती होती.