ताज्या घडामोडी

हॅप्पी इंडियन व्हिलेज मधील मुलेच माझे ईश्वर आहेत-रवी बापटले

आंतर भारती अंबाजोगाई च्या पुढाकारातून सामाजिक प्रकल्पांना भेटींचा उपक्रम

Spread the love

दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी आतंरभारती अंबाजोगाई च्या वतीने हॅप्पी इंडियन व्हिलेज हसेगाव ता. जि. लातूर या सामाजिक प्रकल्पाला अंबाजोगाई शहरातील
आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्यकारणी कार्यकर्ते मा. अमर हबीब, आंतरभारती अंबाजोगाई च्या अध्यक्ष प्रा. डॉ. शैलजा बरुरे, उपाध्यक्ष आशाताई वाघमारे,कोषाध्यक्ष महावीर भगरे, तारका वानखेडे , श्री. शरद लंगे, अनिकेत डीघोळकर,यांच्यासह 60 सदस्यांनी भेट दिली. याप्रसंगी सेवालयाचे संचालक सामाजिक कार्यकर्ते रवी बापटले यांनी “आपल्या हॅप्पी इंडियन व्हिलेज मधील मुलेच माझे ईश्वर आहेत, अशी भावना व्यक्त केली.” याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार मा. अमर हबीब यांनी “सेवालाय हे आधुनिक तीर्थक्षेत्र असल्याचे म्हटले.”

आंतर भारती अंबाजोगाई च्या वतीने मराठवाड्यातील विविध सामाजिक प्रकल्पांना भेट देण्यात येणार आहेत. यातील पहिली भेट हॅप्पी इंडियन व्हिलेज येथे झाली.हासेगाव येथील हॅप्पी इंडियन व्हिलेज एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांचे जगातील पहिले गाव आहे. या सामाजिक प्रकल्पाला भेट दिल्यानंतर निवडक मनोगत झाली.ज्येष्ठ पत्रकार व आंतरभारती राष्ट्रीय कार्यकारणीचे कार्यकर्ते मा. अमर हबीब यांनी सेवालय हे समाजातील सर्वात वंचितांचे जीवन घडविणारे तीर्थक्षेत्र असल्याची भावना व्यक्त केली. अशा सामाजिक प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी समाजातील व्यक्तीने पुढाकार घ्यावा अशी भावना व्यक्त केली. आंतरभारतीच्या अध्यक्ष प्रा. डॉ. शैलजा बरुरे यांनी अशा सामाजिक प्रकल्पांना जोडून घेणे म्हणजे आपल्यातल्या माणूस असण्याच्या क्षमता वाढविणे, असे मत व्यक्त केले.
या सामाजिक प्रकल्प भेटीत अंबाजोगाई शहरातील सर्व नागरिकांनी हासेगाव येथे हॅप्पी इंडियन व्हिलेज येथील सर्व मुलांशी संवाद साधला. या प्रकल्पातील आभाळतळ, ड्रॅगन शेती, एकूण सर्व स्थळांना भेटी दिल्या .तेथील उपक्रम समजून घेतले. वृक्षारोपण केले. अंबाजोगाईकरांनी व सेवालयातील मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.रवी बापटले यांनी आपल्या मनोगतात “हा आजार आमची जगण्याची ऊर्जा बनली आहे, असे मत व्यक्त केले. ही मुलेच माझी ईश्वर असल्याची भावना व्यक्त करून यांच्यावर प्रेम करणे, यांचा सांभाळ करणे, हीच माझी प्रार्थना आहे, असे म्हटले.

या सामाजिक प्रकल्प भेटीत हॅप्पी इंडियन व्हिलेज प्रकल्पाला आंतरभारतीचे सदस्य व जेष्ठ कवी श्री. गणपत व्यास, श्री. उदय असरडोहकर, डॉ.दिलीप खेडगीकर, डॉ.सुलभा खेडगीकर, श्री ओमकेश दहिफळे,श्री. शेंगोळे सर,लेखक श्री. युवराज माने, कवयित्री संध्या सोळंके, कवयित्री तिलोत्तमा पतकराव, अमृत महाजन, सौ. कल्पना महाजन, पत्रकार किरण देशमुख, श्री संकेत तोरंबेकर व स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका