ताज्या घडामोडी
माधुरी पुसकर यांना बुद्धिबळातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार

अंबाजोगाई (प्रतिनिधी ) -येथील रहिवासी व श्री.सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालयातील सहशिक्षिका माधुरी कालिदास पुसकर यांना भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने अंबाजोगाई येथे घेण्यात आलेल्या संस्थांतर्गत बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे.
संस्थेतील विविध संस्कार केंद्रातील महिला शिक्षिकांसाठी घेण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये त्यांनी हे यश मिळवले आहे,त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे शालेय समितीचे अध्यक्ष पवनजी मानधने,मुख्याध्यापिका सुमती भारती तसेच सर्व सहकारी बंधु -भगीनींनी अभिनंदन केले.