अंबाजोगाईत आंबेडकर अनुयायींची मुक रॅली

अंबाजोगाई -: परभणी येथील
भारतीय संविधानाची पूर्णाकृतीची तोडफोड करून विटंबना तसेच केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायींनी शहरातून शुक्रवारी मूक रॅली काढली. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत दोन्ही घटनेतील आरोपींवर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली.
परभणी शहरात भारतीय संविधानाची पूर्णाकृतीची तोडफोड करून आरोपीने विटंबना केली. या घटनेचे उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. तसेच मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या दोन्ही मागणीसाठी अंबाजोगाई शहरात आंबेडकर अनुयायींनी पायी रॅली काढत निषेध नोंदवला. यावेळी नागरिकांनी डोक्याला काळीपट्टी बांधून या दोन्ही घटनेच्या निषेध नोंदवला. या रॅलीनंतर मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांना दिले. याप्रसंगी बब्रुवान पोटभरे, दीपक कांबळे, महादेव आदमाने, शैलेश कांबळे, गोविंद मस्के, दशरथ सोनवणे, राणी गायकवाड यांच्यासह शहर व तालुक्यातील आंबेडकर अनुयायींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.