ताज्या घडामोडी

सर्वसामान्य माणूस म्हणतोय आमदार नमिताताई या कार्यतत्पर लोकप्रतिनिधी..!

केज मतदारसंघात भाजप महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडांची प्रचारात जोरदार आघाडी

Spread the love

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
भाजप महायुतीच्या उमेदवार आ.नमिता मुंदडा यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेऊन संपूर्ण केज मतदारसंघ पिंजून काढला आहे. आ.मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण झंझावाती प्रचार दौऱ्यांमुळे केज मतदारसंघात ओन्ली नमिता मय वातावरण निर्माण झाले आहे.

गुरूवार, दिनांक ७ नोव्हेंबर रोजी केज मतदार संघातील निवडणूक प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने उद्या सकाळच्या सत्रात गोटेगाव, सुकळी, माळेगाव, सुर्डी, सोनेसांगवी १ येथे भेट दिली तर सायंकाळी त्या हिवरा, सोमनाथ बोरगाव, धानोरा, तट बोरगाव व आपेगाव या गावांना भेटी देणार आहेत. केज मतदारसंघ प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी अजूनही जास्तीत जास्त प्रयत्न केले जातील. तसेच या पुढील काळात केज शहरातील पाणीपुरवठा योजना ज्या भागात पोहोचली नाही. तिथे पोहोचवली जाईल व केज शहरातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला जाईल असे आश्वासन आ.नमिता मुंडे यांनी केज शहरात आयोजित विविध बैठकीत नागरिकांना तसेच महिलांना दिले आहे. सर्वधर्मसमभाव जोपासणाऱ्या मुंदडा कुटुंबियांची समाजात क्रेझ कायम आहे. मागील पाच वर्षांत आमदार पंकजाताई मुंडे व माजी खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहून केलेल्या विविध विकासकामांमुळे व प्रगतीपथावर असलेल्या विकासकामांमुळे आ.नमिता मुंदडा यांना केज मतदारसंघाची निवडणूक सोपी झाली आहे अशी केज मतदारसंघातील जनसामान्यांत जोरदार चर्चा ऐकावयास मिळत आहे. मुंदडा कुटुंब हे जनतेसाठी अथक परिश्रम घेणारे आहे, तर आ.नमिताताई यांच्या माध्यमातून अविचल, संवेदनशील, अभ्यासू, कार्यतत्पर, समतावादी, ऊर्जावान, न्यायानिष्ठ व्यक्तिमत्व केज मतदारसंघाला लाभले आहे. येणाऱ्या काळात केज मतदारसंघाचा पहिल्यापेक्षा जास्त भरीव विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे भाजपा महायुतीच्या उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांनी केज मतदारसंघात आयोजित विविध बैठकीत बोलताना सांगितले आहे. आज केज मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस म्हणतोय की, आमदार नमिताताई या कार्यतत्पर लोकप्रतिनिधी आहेत. केज मतदारसंघात भाजप महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडांचा जोरदार झंझावात दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका