ताज्या घडामोडी

आ. नमिता मुंदडा विजयी; विकास कामांना कौल

Spread the love

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
केजच्या जनतेने निवडला पुन्हा प्रगतीचा मार्ग निवडला. आपला विजयी कौल भाजपा महायुतीला दिला. कामगिरी दमदार म्हणून नमिताताई मुंदडा यांना सुज्ञ जनतेने पुन्हा आमदार केले.

विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवार आ.नमिताताई मुंदडा या १ लाख १५ हजार ६८९ मते घेऊन विजयी ठरल्या असून, यानंतर नागरिकांनी पुन्हा मार्ग केजच्या सर्वांगिण प्रगतीचा म्हणून स्वागत केले. केज मतदारसंघात आ.नमिताताई मुंदडा व माजी आमदार पृथ्वीराज साठे अशी सरळ लढत झाली. या निवडणुकीत सर्व प्रमुख पक्षाचे नेते अन् कार्यकर्ते मुंदडांच्या विरोधात होते. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला व भुलथापांना बळी न पडता सुजाण मतदारांनी आ.नमिता मुंदडा यांनी मागील ५ वर्षांत मतदारसंघात जवळपास २ हजार कोटींची विकासकामे केली. या कामांमुळे सामान्य मतदार मात्र विकासाच्या मुद्यांवर मुंदडांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा होता आणि आहे हे या निकालातून पुन्हा स्पष्ट झाले आहे. या लढतीत जवळपास ३ हजार पेक्षा अधिक मतांची आघाडी घेऊन नमिता मुंदडा या विजयी झाल्या आहेत. केज विधानसभा मतदार संघात मतमोजणी प्रक्रिया आज कुठलाही अनुचित प्रकार न होता अतिशय शांततेत पार पडली. केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विद्यमान भाजप महायुतीच्या उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांनी विजय संपादन केला.

*केज मतदारसंघातील सर्व जनतेचे जाहीर आभार :*
केज विधानसभा निवडणुकीत मी, भाजपा महायुतीच्या वतीने उमेदवार होते. या निवडणुकीत आमच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आदरणीय नितीन गडकरी, भाजपा राष्ट्रीय सचिव लोकनेत्या आ.पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी प्रचार सभा घेतल्या तसेच भाजपा, महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे सन्माननीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी डोअर-टू-डोअर जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. तसेच केज विधानसभा मतदारसंघातील जनतेने पुन्हा आम्ही केलेल्या विकासकामांना पुन्हा पसंती दिली. व मतदानरूपी आशीर्वाद दिले. निवडणूक प्रचार प्रक्रिया गतिमान करण्यासाठी मला ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा काकाजी यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व युवा नेते अक्षयजी मुंदडा यांची भक्कम साथ लाभली. त्यामुळे भाजपा महायुतीच्या विजयासाठी ज्यांनी ज्यांनी मदत, सहकार्य करून आशिर्वाद दिले त्या केज मतदारसंघातील सर्व जनतेचे जाहीर आभार.

– नमिता अक्षय मुंदडा
– (नवनिर्वाचित आमदार, केज विधानसभा मतदारसंघ, बीड.)

केज मतदारसंघात सर्वत्र जल्लोष :
केजच्या जनतेने पुन्हा प्रगतीचा मार्ग निवडत नमिता मुंदडा यांना विजयी केले. आपला विजयी कौल भाजपा महायुतीला दिला. शनिवारी मतमोजणीचा दिवस होता. मतमोजणीनंतर नमिता मुंदडा या विजयी झाल्याचे समजताच संपूर्ण मतदारसंघात नागरिक, महिला-भगिनी आणि युवक वर्गाने जागोजागी गुलाल उधळीत, फटाके फोडून, पेढे वाटून आपला आनंदोत्सव साजरा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका