ताज्या घडामोडी

७ ऑक्टोबरला ऍड. असिम सरवदे अंबाजोगाईत

कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त संविधान संवादाचे आयोजन

Spread the love

अंबाजोगाई (प्रतिनिधी) —
शेतकरी, कामगार, कष्टकरी दीन-दलित सर्वहारा वर्गाच्या न्यायासाठी जीवन वेचणारे झुंजार स्वातंत्र सेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अंबाजोगाई येथे ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार, संविधान कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर त्यांच्याशी ‘संविधानाची पायमल्ली होत आहे का?’ याविषयावर संवाद साधणार आहेत.
काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे प्रतिष्ठानच्या वतीने ७ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६:३० वाजता अद्यकवी मुकुंदराज सभागृहात या संविधान संवादाचे आयोजन केले आहे. बदलत्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत संविधानाची गळचेपी होत असल्याची चर्चा आहे. या परिस्थितीत समाजमन भक्कम करण्यासाठी एड. असीम सरोदे सातात्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधणारे ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर हे कीर्तन, व्याख्यान, प्रवचनातून संविधान जागृती करीत आहेत. भारतीय संविधानाला ७५ वर्षे होत असताना या दोन संविधान अभ्यासकांतील हा संवाद अंबाजोगाईकरासाठी एक पर्वणीच ठरणार आहे.
या कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका