ताज्या घडामोडी

नमिता मुंदडा यांच्या विजयासाठी दलित, मुस्लीम ओबीसींची वज्रमुठ ; जातीधर्माचे राजकारण करणारांना चपराक

केज मतदारसंघात पुन्हा 'कमळ' फुलणार ; जनता देतेय ओन्ली नमिताताईंचा नारा

Spread the love

केज (प्रतिनिधी) सर्वसामान्यांचा आवाज गोरगरिब, दीन दलित अल्पसंख्यांकांचा बुलंद आवाज असणारे व्यक्तीमत्व नमिता अक्षय मुंदडा यांनी प्रचारात मुसंडी मारून जातीधर्माचे राजकारण करणारांना चपराक दिली आहे. फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या विरोधकांच्या तंबुत घबराहट निर्माण झाली आहे. केज मतदारसंघात सध्या ओन्ली नमिताताईंची हवा दिसून येत आहे.

प्रस्थापित, सर्व सामान्य, गोरगरिबांच्या गाठीभेटी घेऊन नमिताताई यांनी गुरूवार, दिनांक १४ नोव्हेंबर रोजी केज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सकाळी चंदन सावरगांव, कुंबेफळ, जानेगांव व उंदरी या गावांना भेटी दिल्या. नागरिकांसोबत विविध विकास कामांच्या अनुषंगाने संवाद साधत, येत्या विधानसभा निवडणुकीत मला मतदानरूपी आशीर्वाद देत माझ्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. तसेच काल बुधवार, दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मस्साजोग, आरणगाव, काळेगावघाट, हनुमंत पिंपरी, कापरेवाडी, बोरगाव व भोपला या गावांना भेटी दिल्या. या प्रचार दौऱ्यात सर्व मतदार बंधू, भगिनी, ग्रामस्थांशी संवाद साधला. येत्या विधानसभा निवडणुकीत मला मतदानरूपी आशीर्वाद देत माझ्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. या प्रसंगी तमाम ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने होते. नमिताताई यांच्याकडे मतदारांचे प्रश्न विकासकामांचा अजेंड, दूरदृष्टीचे नेतृत्व दिसू लागल्याने मतदारांनी नमिताताई यांना नेहमीच आपले मानले आहे. त्यामुळे नमिताताई मुंदडा यांनी केज मतदारसंघात प्रचारात आघाडी घेऊन विरोधकांना घाम फोडला आहे. तर आता मतदारांनीच नमिताताईंची प्रचाराची धुरा सांभाळली असून केज मतदारसंघातील चांद्यापासून बांद्यापर्यंत, शहराच्या गल्लीपासून वेशीपर्यंत नमिताताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, ओन्ली नमिताताई अशी जोरदार चर्चा होत आहे. नमिताताई मुंदडा यांना गोरगरीब, दीन दलित, मुस्लिम, मराठा, ऊसतोड कामगार यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वसमभाव आणि सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन चालणारे विकासप्रिय नेतृत्व नमिताताईंना निवडून देण्यासाठी केज मतदारसंघातील मतदार राजा एकवटला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका