ताज्या घडामोडी

महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचा “विशेष प्रतिभा गौरव पुरस्कार” सीए विवेक रांदड यांना प्रदान…

Spread the love

छत्रपती संभाजीनगर येथील चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष सीए विवेक गोपीकिशनजी रांदड यांना *महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेने *”विशेष प्रतिभा गौरव पुरस्कार”* प्रदान करून सन्मानित केले आहे. अंबाजोगाईचे सुपुत्र असलेले आणि सध्या संभाजीनगर येथे कार्यरत असलेल्या विवेक रांदड यांची “युवा शक्ती क्षेत्र” विभागात निवड झाली होती. हा गौरव सोहळा मा. श्री सुगदेवजी बियाणी (आहिल्यनगर), मा. श्री मधुसूदनजी गांधी (प्रदेश अध्यक्ष), आणि मा. श्री सत्यनारायणजी सारडा (प्रदेश सचिव), अखिल भारती माहेश्वरी महासभा अर्थ मंत्री मा श्री राजकुमार कालिया यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे पदाधिकारी, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे कार्यकारिणी सदस्य आणि छत्रपती संभाजीनगरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा पुरस्कार चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशनच्या टीमने समाज सशक्तीकरणाच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याची आणि समर्पणाची दखल म्हणून देण्यात आला. २०१२ साली छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन झालेली ही संस्था औरंगाबाद व अहमदाबाद जिल्ह्यांमध्ये विविध सामाजिक सेवांसाठी कार्यरत आहे. संस्था मानसिक सशक्तीकरण, डिजिटल वेलनेस, गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य, तसेच व्यसनमुक्ती मोहिमा या क्षेत्रांमध्ये कार्य करते. आतापर्यंत संस्थेने १०५० हून अधिक कार्यक्रमांद्वारे दोन लाखांपेक्षा अधिक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.
डिजिटल वेलनेसच्या माध्यमातून सोशल मीडिया व स्क्रीन अ‍ॅडिक्शनच्या वाढत्या समस्यांवर मात करण्यासाठी चेतना फाउंडेशन सातत्याने प्रयत्नशील आहे. नवीन पिढीत सकारात्मक बदल घडवून मूल्याधारित समाजाची उभारणी करणे, हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. चेतना एम्पॉवरमेंट फाउंडेशनने यापूर्वीही विविध पुरस्कार मिळवून समाजासाठी प्रेरणादायी कामगिरी केली आहे.
चेतना फाउंडेशनच्या या यशस्वी प्रवासासाठी शुभचिंतक व सहकाऱ्यांचे योगदान अमूल्य आहे. यापुढेही सर्वांच्या सहकार्याने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून समाजसशक्तीकरणाचे स्वप्न साकार करूया. चला, एकत्र येऊन सशक्त आणि मूल्याधारित समाज निर्माण करूया!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका