दीडशे अंध व्यक्तींना पांढऱ्या काठीचे वाटप

अंबाजोगाई -: येथील बीअँड व्हीजन फाउंडेशनच्या वतीने राजस्थानी मंगल कार्यालयात मराठवाड्यातील दीडशे अंध व्यक्तींना पांढऱ्या काठीचे वाटप करण्यात आले .अंध व्यक्ती विषयी जनजागृती कार्यक्रम मंगळवारी झाला. कार्यक्रमाचे
अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव गोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून अंबाजोगाई येथील मानवलोक संस्थेचे कार्यवाह अनिकेत लोहिया, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम चोपडा उपस्थित होते.
बीअँड व्हीजन फाउंडेशन ही संस्था सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तीसाठी शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, साहित्य, मनोरंजन ,सांस्कृतिक व सामाजिक पुनर्वसन क्षेत्रात कार्यरत असणारी सेवाभावी संस्था आहे. उद्देशपूर्तीसाठी राज्यभरात विविध कार्यक्रम राबवत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डमाधव गोरे यांनी दिली. अनिकेत लोहिया यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी अंबाजोगाई येथील श्री सुहास पाठक आणि मित्र परिवारातर्फे मराठवाड्यातील अंध व्यक्तींना पांढऱ्या काठीचे वाटप अनिकेत लोहिया आणि पुरुषोत्तम चोखडा यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुहास पाठक, जयप्रकाश भुतडा, राजू चोखडा, ईश्वर भुतडा सोमवंशी महाराज यांचे सहकार्य लाभले. व्यासपीठावर संस्थेचे सचिव संदीप चोपडे, सह सचिव मीरा चोपडे आणि सहसचिव प्रशांत गवंडगावे उपस्थित होते.
कार्यक्रमाच प्रास्ताविक आणि संचालन डॉ. माधव गोरे यांनी केले, तर आभार सचिव प्रशांत गवंडगावे यांनी मानले.