३० फेऱ्यांमध्ये होणार केजची मतमोजणी; मतमोजणीसाठी १४ टेबल!
पहिली फेरी सकाळी सव्वा नऊ वाजेपर्यंत होणार पूर्ण

अंबाजोगाई -‘
केज विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडले. शनिवारी मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे. केजच्या तहसील कार्यालयात सकाळी ७ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिपक वजाळे यांनी दिली.
एकूण १४ टेबलांवर मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे पहिल्या फेरीचा निकाल सकाळी सव्वा नऊ वाजेपर्यंत जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केज विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी शांततेत मतदान पार पडले. मतदानाची टक्केवारी ६३.४८
राहिली. या आकडेवारीच्या आधारावर दावे प्रतिदावे सुरू झाले असताना प्रशासन मात्र मतमोजणीच्या तयारीत व्यस्त झाले आहेत. मतमोजणी केंद्र परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
टपाली’नंतरच निकाल-:
‘टपाली’ मतमोजणीसाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे टपाली मतमोजणी आटोपण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे ईव्हीएममधील मतमोजणी सोयीनुसार करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यामुळे सकाळी सात वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीचा निकाल सव्वा नऊ वाजता जाहीर होईल.अशी शक्यता व्यक्त होत आहे.
केज विधानसभा मतदार संघ -:
एकूण मतदार -: ३,८७,२२१
झालेले मतदान -: २,४५,७९९
पुरुष मतदार -: १,३,०८५४
महिला मतदार -: १,१४,९४३
टक्केवरी -: ६३.४८
निकालाकडे लागले सर्वांचे लक्ष-:
केज विधानसभा मतदारसंघात कोण निवडून येणार? या पासून ते राज्यात कोणत्या पक्षाच्या किती जागा येणार. कोणकोणते पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करणार. कोण मुख्यमंत्री होणार? इथंपर्यंत चर्चा रंगत आहेत. लोकांच्या या चर्चेत व अंदाज लावण्यात तासनतास वेळ जात असला, तरी देहभान विसरून कोण निवडून येणार? याकडे लक्ष ठेवून आहेत. तर अनेक जन आपापल्या उमेदवारांच्या निवडणूक गणिताची आकडेमोड करीत बसले आहेत.