ताज्या घडामोडी

अंबाजोगाईत आज सामुहिक श्रीसूक्त हवनचे आयोजन

माहेश्वरी महिला मंडळ व यज्ञ सेवा समितीचा संयुक्त पुढाकार

Spread the love

अंबाजोगाई -:
अंबाजोगाई शहरात आज गुरूवार, दिनांक ७ नोव्हेंबर रोजी परमपूज्य बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराज यांचे प्रमुख उपस्थितीत सामुहिक श्रीसूक्त हवनचे आयोजन करण्यात आले आहे.

माहेश्वरी महिला मंडळ व यज्ञ सेवा समितीचा संयुक्त पुढाकाराने आज गुरूवार, दिनांक ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता योगेश्वरी देवी मंदिर परीसर, अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या सामुहिक श्रीसूक्त हवन कार्यक्रमासाठी शहर व परिसरातील नागरिकांनी सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती व आवाहन आयोजक माहेश्वरी महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. श्रीसूक्त हवनसाठी आवश्यक असणारे साहित्य कार्यक्रम स्थळी उपलब्ध आहे. अशी माहिती ही माहेश्वरी महिला मंडळ व यज्ञ सेवा समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका