रोटरी ने केला स्तन कर्करोगाच्या जनजागृतीचा उपक्रम

अंबाजोगाई -: येथील रोटरी क्लब अंबेजोगाई सिटीच्या सर्व महिला रोटरी सदस्य यांनी रोटरी ऐनस ने मिळून हळदी कुंकू चे आयोजन रोटरी ऑफिसच्या प्रांगणात केले होते. यावेळी स्तनच्या कर्करोगाची माहिती आणि त्यावरील उपाय या विषयी जनजागृती तसेच त्यावर आधारित भित्तीपत्रिका याचे अनावरण केले.
हळदी कुंकू समारंभ हा महिलांसाठी एक दिशादर्शक चळवळ ठरली पाहिजे. या माध्यमातून महिलांच्या आरोग्य व इतर प्रश्नांवर जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम रोटरी उद्यान येथे राबविण्यात आला.
याप्रसंगी कर्क रोग पीडित अर्चना स्वामी यांनी रोगाची लक्षणे आणि त्यापासून बचाव कसा केला पाहिजे, या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. स्तनाच्या कर्क रोगाची जनजागृती करण्याचा अनोखा उपक्रम रोटरी क्लब ने राबवला.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोळंकी ,प्रकल्प संचालक प्रा रोहिणी पाठक , को.डायरेक्टर स्वरुपा कुलकर्णी , रो.मंजुषा जोशी, सुनंदा मुंदडा , कल्पना मुळवाकर, कांचन काळे , रक्षा सोळंकी, मेघना मोहिते,सोनाली कर्णवट, सरिता जाजु,नमिता सारडा यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.
