आयएमए परिषदेत डॉ. भराटे यांचा होणार गौरव

अंबाजोगाई -: इंडियन मेडिकल असोसिएशनची (आयएमए) राज्यस्तरीय वार्षिक परिषद ठाणे येथे होणार आहे. या परिषदेत येथील श्वसनविकार व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमेश भराटे यांचा श्वसनविकार व छातीविकार या विषयातील योगदानाबद्दल गौरव करण्यात येणार आहे.
डॉ. भराटे गेल्या अनेक वर्षापासून येथे आरोग्य सेवा देत आहेत. आयएमए संघटनेचे ते राज्य पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल राज्यपातळी
बरोबरच राष्ट्रीय पातळीवर देखील घेतली आहे. आठ ते दहा नोव्हेंबर या कालावधीत आयएमए महाराष्ट्राची वार्षिक परिषद ठाणे येथे होत आहे. या परिषदेमध्ये राज्यातील काही डॉक्टरांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्ये येथील डॉ. रमेश भराटे यांना गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. याबद्दल त्यांचे राज्य आयएमएचे अध्यक्ष डॉ. दिनेश ठाकरे, डॉ. संतोष कदम, सचिव डॉ. सौरभ सज्जनवाला, डॉ. अनिल पाचणेकर, डॉ. शिवकुमार ऊत्तुरे, डॉ. जयेश लेले, डॉ. अशोक आढाव, डॉ. वसंत लुंगे, डॉ. संजय कदम, डॉ. संतोष कुलकर्णी यांनी स्वागत केले आहे.