अंबाजोगाई साहित्य संमेलन उपक्रम ; २७ ऑक्टोबर रोजी शिक्षक कवी संमेलनाचे आयोजन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
मसाप शाखा अंबाजोगाईच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलन पूर्व उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेले कवी संमेलन २७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले असून या कवी संमेलनात शिक्षक कवींनी सहभागी व्हावे असे आवाहन मसापचे अध्यक्ष दगडू लोमटे, स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार आणि संयोजक विजय रापतवार यांनी केले आहे.
११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलना निमित्त संमेलन पूर्व उपक्रमांतर्गत यापुर्वी कथालेखन कार्यशाळा, गजल लेखन कार्यशाळा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय व्यक्तिचित्रण लेखन स्पर्धा आणि हस्तलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सोबतच आता २७ ऑक्टोबर रविवार रोजी शिक्षक कवी संमेलनाचे आयोजन केले आहे.
शिक्षकांमध्ये असलेल्या साहित्य कलेस वाव देण्यासाठी, शिक्षकांमध्ये दडलेल्या कवीतांना समाजासमोर आणण्यासाठी तसेच शिक्षकांमधील साहित्य कला वाढीस लागावी, या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन केले आहे. या कवी संमेलनात अंबाजोगाई शहरात राहणाऱ्या सर्व शिक्षकांना सहभाग घेता येणार आहे.
उत्कृष्ट कविता सादर करणाऱ्या तीन कवींचा ११ व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येईल. सादर केल्या जाणाऱ्या कवितांची प्रत (टाईप केलेली) संयोजकांना द्यावी लागेल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
सहभागी होणाऱ्या कवींना स्वतःच्या कवितेचे सादरीकरण करावे लागेल. कवितेला विषयाचे बंधन नसेल.
कविता कोणाच्याही धार्मिक-जातीय भावना दुखवणारी अथवा कोणाचे मन दुखावेल अशी वैयक्तिक टीकाटिप्पणी करणारी नसावी. कवितेला भाषेचे बंधन नाही, मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी वा अन्य कोणत्याही भाषेत असली तरी चालेल.
सहभागी कवींना जास्ती जास्त दोन कविता सादर करता येतील.
कविता सादरीकरण हे संयोजनाकडून दिलेल्या वेळेतच पुर्ण करावे लागेल.
कवी संमेलनात सहभागी होण्यासाठी शिक्षक कवींनी आपले नाव व शाळेचे
विजय रापतवार (संयोजक)
7038587248 या क्रमांकावर नोंदवावीत असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
