ताज्या घडामोडी

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय अंबाजोगाई केंद्रात प्रकृती, पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियानातून मौलिक संदेश

ब्रह्माकुमारीज मध्ये दृष्टीकोन बदलायला शिकवतात - ब्रम्हाकुमार पियुषभाई

Spread the love

 

अंबाजोगाई (वार्ताहर)

येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, आनंद सरोवर, वाघाळा रोड, योगेश्वरी नगरी जवळ, अंबाजोगाई केंद्रात शुक्रवार, दिनांक २० सप्टेंबर रोजी प्रकृति, पर्यावरण एवं आपदा प्रबंधन जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभियानातून पर्यावरण संवर्धनाचा मौलिक संदेश देण्यात आला.

 

राज्यातील सोलापूर, उमरगा, उदगीर, लातूर, बीड, धाराशिव, बार्शी, अकलूज, पंढरपूर आणि अंबाजोगाई शहरात १५ ते २५ सप्टेंबर या कालावधीत प्रकृति, पर्यावरण एवं आपदा प्रबंधन जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. अंबाजोगाई केंद्रांतर्गत रेणापूर (जि.लातूर), परळी वैजनाथ आणि अंबाजोगाई शहरात विविध महाविद्यालय व सेवा केंद्रासह एकूण १४ ठिकाणी हे अभियान प्रवचन, प्रदर्शनी, दृकश्राव्य माध्यम शो, स्लाईड शो, गीत-संगीत, स्लोगन्स आदींचा आधार घेऊन व्यापकपणे राबविण्यात आले. समाजात जनजागृती करण्यासाठी हे सध्या अभियान उपयुक्त ठरत आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, आनंद सरोवर येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्र.कु.प्रताप भाई (नि.सहा.मुख्य अभियंता, जल संधारण विभाग), तर मुख्य वक्ता म्हणून राजयोगी ब्रह्माकुमार पियुष भाई दिल्ली (झोनल कोऑर्डिनेटर एसईए प्रभाग) हे होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.बी.वाय.खडकभावी (प्राचार्य, अभियांत्रिकी महाविद्यालय, अंबाजोगाई.), ऍड.श्रीकृष्ण तोष्णीवाल (अध्यक्ष, बीड जिल्हा माहेश्वरी सभा, अंबाजोगाई.), कल्याण काळे (अध्यक्ष, रोटरी क्लब, अंबाजोगाई सिटी.), राजयोगिनी ब्रह्माकुमारी अस्मिता (कार्यकारी सदस्या एसईए प्रभाग.), बी.के.नरेंद्र पटेल बडोदा (कार्यकारी सदस्य, एसईए प्रभाग), राजयोगिनी ब्रह्माकुमारी संगीता (संचालिका, बार्शी सेवाकेंद्र), बी.के.महेश भाई, इंदौर (सदस्य, एसईए प्रभाग), बी.के.सुप्रिया बहन (माऊंट आबू-राज), बी.के.दिनेश भाई (माऊंट आबू-राज), बी.के.धनंजय भाई (माऊंट आबू-राज), बी.के.विष्णू भाई (माऊंट आबू-राज), बी.के.श्रीनिवास भाई (माऊंट आबू-राज), राजयोगिनी ब्रह्माकुमारी महानंदा (संचालिका, उदगीर सेवाकेंद्र) आणि अंबाजोगाई केंद्र संचालिका ब्रम्हाकुमारी सुनीता बहेनजी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राजयोगी बी.के.निर्वैर भाई यांचे दुःखद निधन झाल्यामुळे त्यांच्या पवित्र स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर राजयोगिनी ब्रह्माकुमारी महानंदा दिदी यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करून बी.के.निर्वैर भाई यांचे सेवाकार्य, योगदान याविषयी माहिती देवून शोक संवेदना व्यक्त केल्या. त्यानंतर ब्र.कु.प्रताप भाई यांनी प्रास्ताविक केले. बी.के.निर्वैर भाई यांचे विषयी आपले अनुभव कथन केले. मुख्य वक्ता म्हणून राजयोगी ब्रह्माकुमार पियुष भाई (दिल्ली) यांनी प्रकृती पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियानाचा विधायक उद्देश सांगितला. याप्रसंगी त्यांनी “आपदा प्रबंधन में सकारात्मक चिंतन का महत्व” या विषयावर मौलिक मार्गदर्शन करताना ग्लोबल वार्मिंग, आण्विक शस्त्रांचा वापर, अणुबॉम्बमुळे मानवी जीवन बाधित होत आहे. जल, जंगल, जमिन, हवेचे प्रदूषण होत आहे. त्याचं कारण म्हणजे वाढते प्रदूषण व जंगलतोड हे आहे. त्यामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारच्या आपत्ती येत आहेत. भूकंप, वादळ, महापूर त्सुनामी यामुळे मानवी हानी होत आहे. याला आळा घालण्यासाठी पृथ्वीचे संवर्धन केले पाहिजे, झाडे लावून जतन केले पाहिजे, प्रदूषण होणार नाही अशा उपायोजना केल्यास पर्यावरणाचे संवर्धन होईल. माणसाने आपले वर्तन बदलावे, आपण सुधारलो तरच जग सुधारेल. विज्ञान आणि अध्यात्म हे परस्परपूरक आहे. स्वपरिवर्तन झाल्यास विश्व परिवर्तन होईल. आम्हाला शाश्वत विकास हवा आहे. मागील ३० वर्षांपासून ब्रम्हाकुमारीज हे पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करीत आहे. स्वार्थाऐवजी पुरूषार्थ व परमार्थ यांना प्राधान्य द्यावे लागेल. सकारात्मक विचार जोपासा, ब्रह्माकुमारीज मध्ये दृष्टीकोन बदलायला शिकवतात असे प्रतिपादन ब्रम्हाकुमार पियुषभाई यांनी केले. यावेळी अस्मिता बहेनजी यांनी योग विधी याचे महत्त्व सांगितले. तर संगिता बहेनजी यांनी पर्यावरण संवर्धनासंदर्भात प्रतिज्ञा दिली. प्राचार्य डॉ.बी.वाय.खडकभावी व ऍड.श्रीकृष्ण तोष्णीवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजू बहेनजी यांनी केले तर उपस्थितांचे आभार अंबाजोगाई केंद्र संचालिका ब्रम्हाकुमारी सुनीता बहेनजी यांनी मानले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला, पुरूष, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजक, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, आनंदसरोवर, अंबाजोगाई व वैज्ञानिक व अभियंता प्रभाग, राजयोग शिक्षा व शोध प्रतिष्ठान, माऊंट आबू, राजस्थान यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका