रोटरीने अंबाजोगाईत काढली पोलिओ निर्मूलन मोटारसायकल रॅली

अंबाजोगाई -: येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने पोलिओ निर्मूलन जनजागृती मोटारसायकल रॅली अंबाजोगाई शहरातून काढण्यात आली.
जागतिक पोलिओ दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ आंबेजोगाई सिटी च्या वतीने आशा वर्कर यांना अँपरॉन चे वाटप करण्यात आले.
येथील भगवानबाबा चौकात या मोटार सायकल रॅली ची सुरुवात झाली.पोलिओ चे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर सुहास रामराज यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाचा प्रारंभ झाला. ही रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,यशवंतराव चव्हाण चौक, स्वा.रा.ती.रुग्णालय,गुरुवार पेठ मार्गे मंडी बाजार येथील नागरी रुग्णालयात रॅलीचा समारोप झाला.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आशाताई वर्कर यांना अँपप्रोन चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ बालासाहेब लोमटे, रोटरी क्लब चे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोलंकी, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ सुरेश अरसुडे, संतोष मोहिते , प्रवीण चोकडा, राजेंद्र घोडके, विश्वनाथ लहाने, बालाजी घाडगे, राम सारडा, भीमसेन लोमटे, स्वप्निल परदेशी, गणेश राऊत, प्रा अजय पाठक, आनंद शिरसाट, डॉ सचिन पोतदार, बाबुराव बाबुळगावकर, मंजुषा जोशी, रुपेश रामावत, शकील भाई, बालासाहेब कदम, सचिन बेंबडे, राधेश्याम लोहिया, स्वरूपा कुलकर्णी, संजू गौड, अजित देशमुख, डॉ निशिकांत पाचेगावकर, डॉ अनिल केंद्रे, भागवतराव कांबळे, पुरुषोत्तम रांदड,प्रा. कल्पना मुळावकर, अमित गिरवलकर, भीमाशंकर शिंदे, अनिल लोमटे, प्रदीप झरकर, ओमकेश दहिफळे, यांच्यासह सर्व रोटरी चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.