विद्यार्थ्यांनो आई,वडील व शिक्षकांचा नेहमी आदर राखा – न्यायमूर्ती दिपक खोचे

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- (दि.२५/०१/२०२५ )
विद्यार्थ्यांनो आपल्या जीवनात आई,
वडील व शालेय जीवनातील शिक्षकांचे अतिशय महत्वाचे स्थान आहे.त्यांनी दिलेली संस्काराची
शिकवण आपण नेहमी अंगिकारली पाहिजे.जीवनात यशस्वी व्हायचे असल्यास आई वडील,
शिक्षकांची साथ कधीही सोडू नका तुम्हाला जीवनात यश नक्की मिळेल,
असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश दिपक खोचे यांनी खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त आयोजित कला, विज्ञान प्रदर्शनी व बक्षीस समारंभाच्या प्रसंगी केले.यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर उपस्थित होते.तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य,मुख्य प्रशासकीय समन्वयक चंद्रकांत मुळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा विद्यासभा उपाध्यक्ष उमेश जगताप,स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह किरण कोदरकर,माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल देशपांडे, दिनदयाळ बॅकेंचे अध्यक्ष मकरंद पत्की,
विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बाबुराव आडे,
विद्यार्थी स्नेहसंमेलन प्रमुख सपना डुकरे,विद्यार्थी स्नेहसंमेलन सहप्रमुख सतीश वांगे,विद्यार्थीनी प्रतिनिधी श्रध्दा गडकर,विद्यार्थी प्रतिनिधी कपील आराध्ये हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती, अहिल्यामाई होळकर,भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
राष्ट्रगीत,राज्य गीत व प्रार्थना घेण्यात आली.नंतर राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त मतदार जनजागृती शपथ घेण्यात आली.
शपथ अभ्यास पुरक मंडळ प्रमुख श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रयोगाचे व कला वस्तूंच्या प्रदर्शनीचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.त्यानंतर एनसीसीच्या कॅडेट यांच्याकडून प्रमुख अतिथींना मानवंदना देण्यात आली.नंतर मंचावरील मान्यवरांचा यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला.सर्व अतिथी समोर प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले.सुरूवात सांघिक पद्याने करण्यात आली. कवायत बैठे प्रकार,लाकडीमल्लखांब,
टिपरी नृत्य,सूर्यनमस्कार,योगासने यांचे सादरीकरण करण्यात आले.
अध्यक्षीय समारोप करताना अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर म्हणाले की,
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे स्थापनाच भारतीय संस्कृतीचे जतन विद्यार्थ्यांमध्ये व्हावे व त्यातून देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सक्षम नागरीक घडावेत यासाठी करण्यात आली आहे.याचे कार्य खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात व संस्थेतील इतरही सर्व संस्कार केंद्रात अतिशय जागरूक पणे केल्या जात आहे.याचा मला सार्थ अभिमान आहे.विद्यार्थ्यांनो आपल्या विविध कलागुणांचा विकास व्हावा यासाठीच अशा विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येत असते.ज्यांना बक्षीस मिळाले त्या विद्यार्थ्यांचे तर अभिनंदन आहे.ज्यांना मिळाले नाही त्यांनी पुढील वर्षी अजून प्रयत्न करायचे आहेत.यावेळी विज्ञान प्रदर्शन,कला प्रदर्शन,व विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्या-या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.अध्यक्षीय
समारोपानंतर विद्यार्थी स्नेहसंमेलन निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.या कार्यक्रमासाठी संस्था सभासद,स्थानिक समन्वय समितीचे सदस्य,शालेय समितीचे सदस्य,
पालक,पत्रकार यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र शेप,प्रास्ताविक माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल देशपांडे यांनी,तर विद्यालयाचा वार्षिक अहवाल मुख्याध्यापक बाबुराव आडे यांनी,तसेच विद्यार्थ्यी यादीचे वाचन रूपाली मुळे व पर्यवेक्षक प्रशांत पिंपळे यांनी केले.स्वागत व परीचय विश्वास पत्की,आभार प्रदर्शन स्नेहसंमेलन प्रमुख सपना डुकरे,तर कल्याण मंत्र किशोरी कुलकर्णी,
वैयक्तिक पद्य यज्ञेश धाट याने सादर केले .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक तथा केंद्रीय
कार्यकारिणी सदस्य बाबुराव आडे,
उपमुख्याध्यापक विवेक जोशी,
पर्यवेक्षक सुर्यकांत उजगरे,पर्यवेक्षक प्रशांत पिंपळे,स्नेहसंमेलन प्रमुख सपना डुकरे,सहप्रमुख सतीश वांगे,
अभ्यास पुरक मंडळ प्रमुख श्रीकांत देशपांडे,सहप्रमुख विश्वास पत्की,
लक्ष्मण काटे,सतीश बलुतकर,
विष्णु कुकर,रामकुंवर सांगळे,ज्योती घोडके,पुजा खुर्पे,मोहिनी बर्दापुरे,
अनिल राठोड सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
