मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेच्या सचिवपदी सिद्राम सोळंके

अंबाजोगाई:- भारताची लोकशाही अतिशय समृद्ध असून विद्यार्थ्यांना याची जाणीव व्हावी. महाविद्यालयीन निवडणुका घेतल्या जातात. मतदानाद्वारे लोकप्रतिनिधी निवडण्याचा आपल्याला अधिकार आहे. लोकशाहीमध्ये मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. या गोष्टींची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, त्यांनी निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी व्हावे. यासाठी निवडणूका घेण्यात येतात. मात्र आज अंबाजोगाई येथील मानवलोक समाज कार्य महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी निवडायचे होते. यामध्ये सर्वानुमते सिद्राम सोळंके यांची विद्यार्थी परिषदेच्या सचिव पदी बिनविरोध निवड करण्यात आली. कृष्णा शिंदे,भाग्यश्री कराड, सायली निशिगंध,पल्लवी काळे, बालाजी किर्दन्त, नितीन गोरे, समीर शेख, या विद्यार्थ्यांची विविध विभागाचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. निवड झालेल्या प्रतिनिधींची मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव,डॉ.हनुमंत साळुंखे यांनी अभिनंदन केले.