विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विज्ञान प्रदर्शन अतिशय गरजेचे आहे
वसंतराव काळे पब्लिक स्कूल येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

डॉ. नरेंद्र काळे सर
सचिव क्षितिज प्रतिष्ठान अंबाजोगाई
(अंबाजोगाई प्रतिनिधी)
अंबाजोगाई येथील वाघा रोड परिसरातील वसंतराव काळे पब्लिक स्कूल येथे विज्ञान प्रदर्शन आज १२ मार्च २०२५ उत्साहात आयोजित करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगाचे सादरीकरण केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्रीमती संस्कृती गंगणे मॅडम, संचालक गंगणे सायन्स टिटोरियल, इंजिनिअर सुरेश कुमार कदम सर सचिव, जिजाई प्रायमरी इंग्लिश स्कूल, क्षितिज प्रतिष्ठानचे सचिव डॉ नरेंद्र काळे सर व वसंतराव काळे पब्लिक स्कूलचे पर्यवेक्षक सुमंत केदार सर यांची प्रमुख उपस्थिती होती तर परीक्षक म्हणून उत्कृष्ट भूमिका निभावणारे संस्कृती गंगणे मॅडम व सुरेश कुमार कदम सर मंचावर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रयोगाची पाहणी मान्यवरांनी केली नाविन्यपूर्ण प्रयोग सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांसी संवाद साधत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मान्यवरांनी दिली.
सी.व्ही. रमण व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विज्ञान प्रदर्शनास सुरुवात करण्यात आली. इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग, आधुनिक सिंचन पद्धती, पवनचक्की, सोलार एनर्जी, हृदयाचे वर्किंग मॉडेल, मानवी उत्सर्जन संस्था, पोषणतत्वे, चंद्रयान थ्री, पाणी शुद्ध करण्याच्या पद्धती, पदार्थाची घनता, मॉडल्स सिटी, लिटमस टेस्ट, हवेतील मूलभूत घटक, मुख्य ज्ञानेन्द्रिय, प्रकाशाचे परावर्तन, पृथ्वी व सूर्यमाला अशा विविध विषयावर विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रयोगाचे सादरीकरण केले. यावेळी संस्कृती गंगणे मॅडम व नरेंद्र काळे सर यांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तर सुरेशकुमार कदम सर यांनी डॉ.सी.व्ही. रमण यांनी केलेल्या रमन इफेक्ट बद्दलची माहिती तसेच त्यांनी केलेल्या विविध संशोधनाबाबत माहिती दिली.तसेच विज्ञानाची सुरुवात आपल्या स्वयंपाक घरापासून होते याची विविध उदाहरणे,दाखले देऊन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी शाळेबरोबरच घराचे सुद्धा योगदान महत्त्वाचे आहे असे सांगितले. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विज्ञान प्रदर्शन अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन याप्रसंगी केले.
तर या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे प्रास्ताविक विज्ञान विषयाचे शिक्षिक प्रमोद सिताप सर यांनी केले तर सूत्रसंचालन नूरजा काझी मॅडम यांनी केले
यावेळी या कार्यक्रमयशस्वी करण्यासाठी विज्ञान विषयाच्या सहशिक्षिका मनीषा पाटील मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली