भाजपा महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी साधला वकिल बांधवांशी संवाद
मागील पाच वर्षांत मतदार संघात केलेल्या विकास कामांची दिली माहिती

=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
केज विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुती मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनी शुक्रवार,दि.14 नोव्हेंबर रोजी वकिल संघ अंबाजोगाईच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी थेट संवाद साधला. मागील पाच वर्षांत केलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी यावेळी उपस्थित वकिल बांधवांना दिली. विकासाचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत. प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि केज मतदारसंघासाठी सातत्यपुर्ण विकास होण्यासाठी मला पुन्हा एकदा निवडून द्या, विजयी करा असे आवाहन नमिता मुंदडा यांनी केले.
भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ.पंकजाताई मुंडे, माजी खा.डॉ.प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या मार्गदर्शनानूसार आपण मागील पाच वर्षांत केज मतदारसंघात करोडो रूपयांचा निधी खेचून आणला. या निधीतून अनेक विकास कामे पुर्ण झाली. काही लवकरच पुर्ण होणार आहेत. प्रलंबित राहिलेले विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अंबाजोगाई वकिल संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी आपल्याला पुन्हा एकदा मतदानरूपी आशिर्वाद द्यावेत व कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या कालावधीत मतदान करून प्रचंड मतांनी विजयी करावे अशी विनंती व आवाहन 232-केज विधानसभा मतदार संघ भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांनी केले आहे. वकील संघ, अंबाजोगाई येथे आयोजित संवाद बैठकीत उपस्थित राहून सर्व वकील बांधवांशी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर संवाद साधला. मागील 5 वर्षांत मतदारसंघात झालेली विकासकामे आणि भविष्यातील ध्येय – धोरणांसंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. या प्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष, सचिव आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात वकिल बांधवांचे जे प्रश्न, मागण्या असतील त्या सोडविण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण कटीबद्ध असल्याचे नमिता मुंदडा यांनी सांगितले. यावेळी वकिल संघ अंबाजोगाईचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. तर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नमिता मुंदडा यांनी सांगितले की, अंबाजोगाई शहरात स्थायिक होण्यासाठी चांगले वातावरण असल्याने अंबाजोगाई शहरात खरेदी – विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. त्यामुळे येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय (रजिस्ट्री ऑफिस) येथे प्रचंड गर्दी असते. सध्या हे कार्यालय नगरपालिका वाचनालयाच्या इमारतीत भाडेतत्त्वावर कार्यरत आहे. कार्यालयातील वाढती गर्दी आणि अपुरी जागा यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. शिवाय प्रशासनाला देखील अपुर्या जागेमुळे अडथळा येत होता. याबाबत आपण महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडे पाठपुरावा करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे सह दुय्यम निबंधक वर्ग -2 इमारतीसाठी 2.53 कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला. इमारतीचे भूमिपूजन झाले असून काम प्रचंड वेगात सुरू आहे. अशी माहिती दिली.