जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत डॉ. गणेश मुडेगांवकर प्रथम

(सोलापूर): राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, पुणे यांच्या तर्फे दरवर्षी राज्यस्तरीय नवोक्रम स्पर्धा घेण्यात येते. शैक्षणिक वर्ष 2024 25 साठी घेण्यात आलेल्या नवोपक्रम स्पर्धेमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक गटामधून डॉ. गणेश अनंतराव मुडेगावकर, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक, संगमेश्वर कॉलेज, सोलापूर यांचा नवोपक्रम जिल्हास्तरावरती प्रथम आला आहे. “इयत्ता बारावी इंग्लिश विषय विद्यार्थ्यांचे वस्तुनिष्ठ प्रश्न निर्मिती कौशल्य आणि लेखन कौशल्य विकसन” यासाठी हा नवोपक्रम घेण्यात आला होता. हा उपक्रम जिल्हास्तरावरती प्रथम ठरला आहे. या उपक्रमासाठी सहकारी शिक्षक तेजश्री तळे, कोमल कोंडा, मल्लिकार्जुन पाटील आणि शिवराज देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
डॉ. मुडेगावकर यांचे संगमेश्वर शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. धर्मराज काडादी, सचिव ज्योती काडादी, प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, उप प्राचार्य श्री. प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक डॉ. मल्लिनाथ साखरे आणि सर्व सहकारी शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.