श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात दिवाळी निमित्त सामाजिक भान जपत आनंदग्राम प्रकल्पास भेट

अंबाजोगाई : भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालय सामाजिक भान ठेवत समाजातील होतकरू कष्टकरी पालकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून होतकरू पालकांच्या पाल्याला शालेय गणवेशाचे वितरण शालेय समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल दादा देशपांडे,प्रशालेचे मुख्याध्यापक तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बाबुराव आडे,पर्यवेक्षक सूर्यकांत उजगरे,प्रशांत पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले.शिक्षकांत समाजातील उपेक्षित लोकांच्या विषयी असलेला स्नेह दिवाळी भाऊबीज निमित्त दरवर्षी एका सामाजिक संस्थेला देणगी रूपात भेट देवून जपण्याचा प्रयत्न केला जातो.यावर्षी इनफंट इंडिया संस्थेद्वारा एच आय व्ही बाधीत मुलांसाठी आनंदग्राम संस्था पाली जि.बीड समाजसेवक दत्ता बारगजे हे पालकत्व सांभाळत आहेत.
त्यांच्या प्रकल्पास भेट देवून कार्य कसे चालते याची ओळख करून घेतली . शिक्षकांमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या निमित्ताने संस्थेसाठी आवश्यक असलेल्या दोन सतरंजी भेट देऊन येथिल एच आय व्ही बाधित मुलांचीदिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे .यावेळी मुख्याध्यापक तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बाबुराव आडे,उपमुख्याध्यापक माधव जोशी,
पर्यवेक्षक प्रशांत पिंपळे,विद्यालयातील सहकारी शिक्षक विवेक जोशी, विस्तार सेवा प्रमुख लक्ष्मण काटे,अभ्यास पूरक मंडळ प्रमुख श्रीकांत देशपांडे,कार्यालयीन प्रमुख संजय राडीकर हे या संस्थेस भेट प्रसंगी उपस्थित होते .