ताज्या घडामोडी

“युवकांनी उच्च ध्येय बाळगावे ” मुख्याधिकारी अर्पिता ठुबे

Spread the love

अंबाजोगाई (प्रतिनिधी) युवकांनी उच्च ध्येय बाळगून वाटचाल करावी यश हमखास मिळते पण त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पाहिजे कोणत्याही कारणाने निराश न होता आपले ध्येय साध्य करण्यासाठी अविरत प्रयत्नशील रहावे असे आवाहन अंबाजोगाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आय. ए. एस. अर्पिता ठुबे यांनी केले . येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीराचे उद्घाटन अर्पिता ठुबे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना आपण ग्रामीण भागात आलेले आहात, या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागाचे प्रश्न समजून घ्यावेत व या समस्या सोडविण्यासाठी आपल्यापरिने प्रयत्न करावेत असे आवाहन अर्पिता ठुबे यांनी केले . या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा. माणिकराव लोमटे यांच्या संबोधनाने झाला. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कुंबेफळ गावात चांगले रचनात्मक काम करावे .आपण आपल्या कामातून या गावाशी एक वेगळे नाते प्रस्थापित करावे असे आवाहन प्रा. माणिकराव लोमटे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. थारकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या शिबिरातून बरेच कांही शिकता येते तशी दृष्टी आपण बाळगली पाहिजे असे मत व्यक्त केले. या प्रसंगी विलास काका सोनवणे ,(मा. सभापती कृ.उ.बा. स.अंबाजोगाई) यांनी मनोगत व्यक्त केले.कुंबेफळ गावचे सरपंच लिंगेश्वर तोडकर उपसरपंच प्रमोद भोसले यांनी समयोचित भूमिका व्यक्त केली. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. किरण चक्रे, पदव्युत्तर विभागाच्या संचालिका व कार्यक्रमाधिकारी डॉ शैलजा बरुरे तसेच डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन स्वयंसेवकांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका