ताज्या घडामोडी

भाशिप्रनंतर दीनदयाळ नागरी बँकेची मोबाईल बंदी – चेअरमन अ‍ॅड.मकरंद पत्की

Spread the love

अंबाजोगाई(प्रतिनिधी)-शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या भाशिप्र संस्थेने महाविद्यालय तथा शाळेत तासिका चालु असताना मोबाईल वापरास बंदी घातल्यानंतर आर्थिक क्षेत्रात नावारूपाला आलेल्या येथील दीनदयाळ नागरी सहकारी बँकेने देखील कामकाज चालु असताना मोबाईल वापरावर बंदी घातली असुन तशा प्रकारच्या व्यवस्थापनाला सुचना दिल्याची माहिती चेअरमन अ‍ॅड.मकरंद पत्की यांनी दिली. दरम्यान हाच आदर्श इतर बँका तथा शिक्षण संस्थांनी घेवुन मोबाईल वापर कमी करावा अशी मागणी आता सर्वच स्तरातून होत आहे.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी संचालक मंडळाच्या बैठकीत अशा प्रकारचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आल्याचे कळते. संस्थेच्या महाविद्यालय, शाळा व्यवस्थापनाला सुचना गेल्या असुन प्राध्यापक, शिक्षक तासावर जेव्हा असतात त्यावेळी मोबाईल वापरायला बंदी संस्थेने केली आहे. वास्तविक पहाता शिकवणी करत असताना जेव्हा मोबाईल येतात त्यावेळी सदर शिक्षक तो घेतात मग संपुर्ण लक्ष्य विचलीत होते. शिवाय सर्व मोबाईल सकारात्मक येतात असे नव्हे. नकारात्मक मोबाईल आल्यानंतर मानसिकता बिघडते आणि शिकवणीच्या आईचा घो हे लक्षात आल्यामुळे संस्थेने तशा प्रकारचा निर्णय घेतला.कार्यवाह डॉ.हेमंत वैद्यनी कार्यकारी संचालक मंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा होवुन मोबाईल बंदी घातल्याचे सांगितले. दरम्यान आर्थिक क्षेत्रात काम करणार्‍या राष्ट्रीयकृत बँका तथा नागरी बँकेत देखील कामकाजा व्यतिरिक्त मोबाईल बघत बसण्याची सवय खर्‍या अर्थाने समोर आलेल्या ग्राहकांना सन्मान वागणुक मिळत नाही. शिवाय आर्थिक चुका होवु शकतात. एवढेच नाही तर अनेक कर्मचारी बसल्या टेबलवर वेगवेगळे अ‍ॅप पहात बसतात. ज्यामुळे दिवसभराचे कामकाज शिल्लक रहाते. एवढेच नाही तर आपल्या टेबलसमोर कोण आलं याचे देखील भान रहात नाही. कारण मोबाईल या ठोकड्याने सर्वांनाच वेड लावल्यामुळे त्याचे वेगवेगळे परिणाम समोर येतात. वास्तविक पहाता शिक्षण संस्था असो किंवा अन्य संस्था खर्‍या अर्थाने आता मोबाईल पार्किंग व्यवस्था स्वतंत्र बनवावी लागेल. याचाच पहिला प्रयोग दीनदयाळ नागरी बँकेने हाती घेतला असुन बँके अंतर्गत येणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना कडक सुचना देवुन मोबाईल वापरावर बंदी घातल्याची माहिती चेअरमन पत्की यांनी दिली. प्रशासना मार्फत तशा प्रकारच्या शाखाधिकार्‍यांना सुचनाही गेल्या असुन मोबाईल गैरवापरामुळे वेगळे काही प्रकार घडु नयेत याचीही काळजी घेण्याची गरज वाटते. बदलापुर बलात्कार प्रकरणानंतर राज्यात सर्व क्षेत्रात संस्था सतर्क झाल्याचे दिसुन येतं. सीसीटिव्ही कॅमेरे आता सर्वांची गरज होवुन बसली. जिथे सिसिटीव्ही नाहीत त्यांच्या विरोधात शासन देखील कारवाई करणार आहे. महिला तथा मुलींच्यासाठी सर्व व्यवस्था स्वतंत्र असणेही बंधनकारक असुन प्रशासनाने तशा प्रकारच्या सुचना व्यवस्थेला काढल्याचे कळते. पत्की म्हणाले की, आमच्याकडे सुचना काढताच जवळपास सर्व बँक कर्मचार्‍यावर मोबाईल बंदी आणि त्याची कठोर अंमलबजावणी सुरू झाली. एवढेच नाही तर ऑनलाईन बँका झाल्यामुळे तंत्रज्ञानाच्या आधारे कुठल्याही बँकेत कोणता कर्मचारी मोबाईल पहात बसतो हे देखील व्यवस्थापनाच्या समोर येत असल्याचे पत्की यांनी सांगितले. बाकी काही असले तरी भाशिप्र शिक्षण संस्था तथा दीनदयाळ नागरी बँकेचा आदर्श समाजात इतर कार्यरत असलेल्या लोकांनी घ्यायला हवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका