महिलांनी घेतली मतदान करण्याची सामूहिक प्रतिज्ञा
योगेश्वरी महाविद्यालयाच्या वतीने दांडीया कार्यक्रमात मतदान जनजागृती

अंबाजोगाई -:
“आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परपरांचे जतन करु. आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू .व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु.” अशी सामूहिक
प्रतिज्ञा महिलांनी घेतली.
कार्यक्रम घेण्यात आला.
येथील सौभाग्य मंगल कार्यालयात मंदाकिनी योगा ॲन्ड झुंबा फिटनेस सेंटर व वसुंधरा सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मंदाकिनी दुर्गा महोत्सव अंतर्गत दांडीया स्पर्धेत योगेश्वरी महाविद्यालयाच्या वतीने मतदार जनजागृती करण्यात आली. यावेळी उपप्राचार्य अजय पाठक यांनी लोकशाही मधील मतदानाचे महत्व विशद केले. यावेळी मतदान करण्यासाठी सर्वांना सामुहिक प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी संयोजिका मंदाकिनी गित्ते, महिला, दांडीया स्पर्धे साठी जमलेले अनेक संघ, नागरिक उपस्थित होते. योगेश्वरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य अजय पाठक डॉ. आनंद जोशी, एम. एस. डोके, व विद्यार्थी उपस्थित होते.