खोलेश्वरच्या माजी विद्यार्थींचा मेळावा संपन्न

अंबाजोगाई( प्रतिनिधी)
श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या 2014 साली दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञतेचा भाव व्यक्त करत मेळावा संपन्न केला.
दीपावलीच्या सुट्टीत अंबाजोगाईत आलेल्या श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या 2014 साली दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेत माजी विद्यार्थी मेळावा घेण्याचे ठरवून आपल्या गुरुजनांचा सत्कार व शाळेला भेट वस्तू देऊन शाळेप्रती असणार स्नेहभाव जपला.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक निवृत्ती दराडे, मुख्याध्यापक बा ह केंद्रे, व्ही के गायकवाड, राजू शेप, सौ विनया कुलकर्णी, राहुल नाईक, शैलेश कंगळे, ग्रंथपाल रा ह कुलकर्णी, व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे म्हणाले की माजी विद्यार्थी संघटन ही काळाची गरज आहे. या माध्यमातून शाळेप्रती असणारा विद्यार्थ्यांचा स्नेहभाव जपला जातो. आपल्या गुरुजनां बद्दलचा आदरभाव व स्नेह वृद्धिंगत होतो. या उपक्रमाची इतर माजी विद्यार्थ्यांनी नोंद घेऊन असे माजी विद्यार्थी मिळावी संपन्न करावे असे आवाहन केले. याप्रसंगी बोलताना माजी मुख्याध्यापक निवृत्ती दराडे म्हणाले की माजी विद्यार्थी मेळावा हा उपक्रम माझ्या मनाला खूप भावला आहे या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेविषयी माजी विद्यार्थ्यांचे असणारे प्रेम व्यक्त होते. सर्वप्रथम माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनेक माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला चार कचराकुंड्या भेट दिल्या. या उपक्रमाच्या माध्यमातून मुख्याध्यापक व माजी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला. या उपक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.