संकेत मोदी यांनी आयोजित केलेल्या ढोल ताशा स्पर्धेला गणेशभक्तांची मोठी दाद

अंबाजोगाई :- महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेली ढोल ताशा स्पर्धेचे आयोजन
प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व संयोजक संकेत मोदी यांच्या वतीने शनिवारी वंजारी वसतिगृहाच्या मैदानावर
करण्यात आले होते. स्पर्धेचे यावर्षीचे हे दुसरे वर्ष होते.
या स्पर्धेच्या उदघाटनास व्यासपीठावर संयोजक संकेत राजकिशोर मोदी, दीनदयाळ ना सह बँकेचे संचालक बिपिन क्षीरसागर, यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक अभिजित जोंधळे, आदर्श क्रीडा शिक्षक दत्ता देवकते, प्रा ज्ञानेश्वर सोनवणे,महादेव आदमाणे, शाकेर काझी, अकबर पठाण तर विजयी संघाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रियदर्शनी क्रीडा मंडळाचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, प्रा वसंत चव्हाण, ऍड. विष्णुपंत सोळंके, मनोज लखेरा, ऍड. संतोष पवार, ऍड. दयानंद लोंढाळ, राजेंद्र मोरे, तानाजी देशमुख, दिनेश भराडीया
आदींची उपस्थिती होती.
या स्पर्धेची सुरुवात श्रीफळ वाढवून आणि ढोल ताशाचे पूजन करून करण्यात आली. स्पर्धेचे प्रास्ताविक संयोजक संकेत राजकिशोर मोदी यांनी केले.पारंपरिक वाद्ये संस्कृती जतन करण्यासाठी अश्या स्पर्धा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सहभागी संघातून २१०००/-रुपयाचे प्रथम पारितोषिक तरुण गणेश मंडळ , कुत्तर विहीर या ढोल ताशावाद्य पथकाने पटकावले. तर द्वितीय क्रमांक आणि १५०००/- रुपये अंबाजोगाई चा राजा श्री साई गणेश मंडळ परळी वेसच्या ढोल ताशा पथकाने मिळवला. त्याचबरोबर रुपये ११०००/-व तृतीय क्रमांक बाल गणेश मंडळाच्या ढोलताशा पथकास मिळाला. ५००० रूपयांचे उत्तेजनार्थ बक्षीस शहरातील नवयुवक गणेश मंडळाच्या ढोलताशां पथकास देण्यात आले. या सांघिक स्पर्धेबरोबरच वैयक्तिक ढोलवाद्य व वैयक्तिक ताशावाद्य स्पर्धकास देखील स्मृतिचिन्ह व विशेष प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.सहभागी झालेल्या प्रत्येक मंडळास सहभाग प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह संयोजकांच्या वतीने देण्यात आले. संयोजक संकेत मोदी यांचे सहकारी मित्र दिग्विजय बाळासाहेब सोनवणे यांनी या स्पर्धेत प्रेरित होऊन केवळ मुलींचा संघ असलेला ज्ञानप्रबोधिनी ढोल ताशा वाद्य पथकास ११०००/रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान केले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संकेत राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.