ताज्या घडामोडी

क्रांतीची बिजे ही साहित्यातूनच पुढे येतात – डॉ.शिरीष खेडगीकर

११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन

Spread the love

अंबाजोगाई -: क्रांतीची बिजे ही साहित्यातूनच पुढे येत असतात. मग ती क्रांती वैचारिक असो की, साहित्यीक असो. विचाराला सकस लेखनाची जोड मिळाल्यानंतरच ही क्रांतीची बिजे स्पुलींग रूप धारण करतात. असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ साहित्यीक तथा दंत चिकित्सक डॉ.शिरीष खेडगीकर यांनी केले.
१४ व १५ डिसेंबर रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात होत असलेल्या ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून डॉ.शिरीष खेडगीकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष बालाजी सुतार, स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार, मसापचे अध्यक्ष दगडु लोमटे, ज्येष्ठ साहित्यीक अमर हबीब, सचिव गोरख शेंद्रे , डॉ.कमलाकर कांबळे, प्रा.डॉ.शैलजा बरूरे, प्रा.देविदास खोडेवाड, डॉ.राहुल धाकडे, रेखा देशमुख, तिलोतमा पतकराव, स्वागत समितीचे सचिव प्रा.पंडीत कराड, उपाध्यक्ष सुभाष बाहेती यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ.खेडगीकर म्हणाले की, मराठी भाषेचा र्‍हास सुरू असताना अशी गावची संमेलने दिशादर्शक ठरतात. एकीकडे मराठी शाळांची होत असलेली दुरावस्था मराठी भाषेविषयी असाणारी उदासिनता अशा भिषण परिस्थितीत निश्‍चितच हे गावचे संमेलन नवा मार्ग दाखविल. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकाश्रयातून होणारं गावचं संमेलन ही वेगळी ओळख अंबाजोगाईकरांनी जपल्याचे त्यांनी सांगितले. हे संमेलन ईव्हेंट नव्हे तर मुमुेंन्ट आहे. ही चळवळ आगामी काळात समाजजागृतीचा जागर निर्माण करणारी ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना बालाजी सुतार म्हणाले की, चांगल्या वाचकातूनच लेखकाचा जन्म होत असतो. परिसर सभोवताल यांच्या व्यथा साहित्यातून मांडण्यासाठी लेखकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. साहित्याला बळ देणारी ही संमेलने अखंडीत राहिली तर समाजाला नवी दिशा मिळेल. असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संमेलनाच्या निमित्ताने दिला जाणारा डॉ.शैला लोहिया लेखिका पुरस्कार रचना यांना, मंदाताई देशमुख कथा लेखन पुरस्कार उमेश मोहिते यांना, प्राचार्य संतोष मुळावकर शिक्षक लेखक पुरस्कार अलिम अजिम यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम दोन हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. प्रारंभी संमेलनाची सुत्रे दिपप्रज्वलन करून हस्तांतरीत करण्यात आली. मसापचे अध्यक्ष दगडू लोमटे यांनी प्रज्वलीत केलेली मनबत्ती संमेलनाध्यक्ष बालाजी सुतार यांच्याकडून सोपवून संमेलनाचे सुत्रहस्तांतरण केले. यावेळी स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांनी आपल्या प्रास्ताविकात संमेलनाची भूमिका विषय केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत जोंधळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार गोरख शेंद्रे यांनी मानले. या कार्यक्रमास साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका