‘सिफा’च्या सचिवपदी शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट यांची निवड

हैदराबाद -: शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांची देशातील शेतकरी संघटनांची शिखर संघटना असलेल्या भारतीय किसान सांघ परिसंघ (सिफा)च्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाली आहे.सिफाचे मुख्य सल्लागार पी.चेंगलरेड्डी यांनी सिफाच्या हैदराबाद येथील राष्ट्रीय किसान संमेलनात ही घोषणा केली.
कालिदास आपेट यांनी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते म्हणून शरद जोशी यांच्या नेतृत्वात सन 1983 साली विद्यार्थी दशेपासून सुरुवात केली.सन 1988 ते 1990 पर्यंत शरद जोशी यांच्या समवेत आंबेठाण जि.पुणे येथे वास्तव्य केले. शेतकरी संघटनेने पुकारलेल्या कर्जमुक्ती,ऊसाची झोनबंदी, कापसावरिल प्रांतबंदी आणि कर, कर्जा नहीं देंगे,बिजली का बील भी नहीं देंगे!या शेतकरी विरोधी कायद्यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला आहे.
शरद जोशी यांच्या विचारांवर राष्ट्रीय पातळीवर काम करणारी सिफा ही एकमेव संघटना आहे. सिफाच्या सचिवपदी कालिदास आपेट यांची निवड करताना डावीकडून पी.चेंगलरेडडी, नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष बिपिनभाई पटेल,मानद अध्यक्ष रघुनाथदादा पाटील,सिफाचे जनरल सेक्रेटरी शंकर नारायण रेड्डी आणि कालिदास आपेट दिसत आहेत.