ताज्या घडामोडी
प्रा.गणेश मुडेगांवकर लिखित “संथ वाहते गोदामाई” एकांकिकेस लेखनाचे पारितोषिक

अंबाजोगाई -: येथील भूमिपुत्र तथा संगमेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.गणेश मुडेगांवकर
लिखित “संथ वाहते गोदामाई” एकांकिकेस लेखनाचे पारितोषिक मिळाले आहे.
अभिनय, कल्याण आणि कलाश्रय, मुंबई आयोजित राज्यस्तरीय कै. जयदेव हट्टंगडी स्मृती एकांकिका लेखन स्पर्धा 2024 : “एकांकिकाकार 2024” उत्साहामध्ये संपन्न झाली. या एकांकिका लेखन स्पर्धेसाठी मकरंद अनासपुरे आणि प्रा. दासू वैद्य यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. या स्पर्धेमध्ये प्रा.डॉ. गणेश मुडेगांवकर यांना “संथ वाहते गोदामाई” या एकांकिकेसाठी “उत्तेजनार्थ” पारितोषिक प्राप्त झाले आहे. याबद्दल त्यांचे नाट्य क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.