ताज्या घडामोडी

संघर्षभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा

Spread the love

अंबाजोगाई :- धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त संघर्षभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धम्म ध्वजारोहण , महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन , समुहीक वंदना , २२ प्रतिज्ञा ग्रहण , पुष्प वर्षाव व जाहीर धम्मसंदेश असे विविध कार्यक्रम संघर्षभूमीवर झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जेष्ठांच्या हस्ते तथागत बुद्धांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आले. बालकांच्या हस्ते सम्राट अशोकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच महिलांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सामुहीक वंदना घेण्यात आली. धम्मप्रिया लोणारे व स्वयंदीप भटकर या बालकांनी २२ प्रतिज्ञांचे वाचन घेतले. याप्रसंगी प्रा डॉ गणेश सुर्यवंशी व डॉ किर्तीराज लोणारे
यांनी उपस्थितांना मंगल कामना दिल्या. तसेच अॅड शाम तांगडे यांनी ‘ तिसऱ्या जगाचे महानायक डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची धमक्रांती ‘ या विषयावर प्रासंगिक धम्मसंदेश दिला. या कार्यक्रमाचे संचलन व प्रास्ताविक अॅड संदीप थोरात यांनी केले. तर संजय हतागळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी द्रुपदा सरवदे , अनंत सरवदे , विश्वनाथ सावंत , मुरलीधर कांबळे , पंकज भटकर , अर्जुन वाघमारे , गुलाबराव गायकवाड आदींनी विशेष प्रयत्न केले. या धम्मक्रांती महोत्सव कार्यक्रमास भगवान बुध्दनगर , सम्राट अशोकनगर , जयभीमनगर , आहिल्यानगर , मेडीकल कॉर्टर , स्नेहनगर , क्रांतीनगर , व्हि जे आरकनगर , आयोध्यानगर , माळीनगर , सह्याद्रीनगर , चनई परिसर , मोरेवाडी परिसरतील नागरिकांचा सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका