दुसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन अंबाजोगाई.
संमेलनाचे उद्घाटन ख्यातनाम उर्दू मराठी गझलकार डॉ. संदीप गुप्ते यांच्या हस्ते तर समारोप ख्यातनाम उर्दू मराठी गझलकार डॉ. गणेश गायकवाड यांच्या उपस्थित होणार

गझल साधना पुरस्कार गझलगंधर्व सुधाकर कदम यांना देण्यात येणार
अंबाजोगाई – साधना सेवाभावी संस्था आयोजित दुसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन अंबाजोगाई येथे दिनांक १व २ फेब्रुवारी होत असून या संमेलनाचे उद्घाटन ख्यातनाम उर्दू मराठी गझलकार डॉ. संदीप गुप्ते – ठाणे यांच्या हस्ते होणार असून यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे – मुंबई, माजी संमेलनाध्यक्ष शिवाजी जवरे – बुलढाणा, माजी स्वागताध्यक्ष डॉ.प्रा. सदाशिव सूर्यवंशी – धुळे, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे – अंबाजोगाई, रसिकाग्रणी नाना लोढम – अमरावती, यशवंतराव चव्हाण सेंटरचे दत्ता बाळसराफ – मुंबई, गझलकार प्रशांत वैद्य – टिटवाळा, आमदार नमिता मुंदडा- अंबाजोगाई माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी – अंबाजोगाई, माजी आमदार पृथ्वीराज साठे – अंबाजोगाई यांच्या उपस्थित होणार असून समारोप समारंभ ख्यातनाम उर्दू मराठी गझलकार डॉ. गणेश गायकवाड – बुलढाणा यांच्या उपस्थितीत व योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर – अंबाजोगाई, राजेसाहेब देशमुख – माजी स्वागताध्यक्ष ३९ वे मराठवाडा साहित्य संमेलन अंबाजोगाई यांच्या उपस्थित संपन्न होणार अशी माहिती स्वागताध्यक्ष दगडू लोमटे, कार्याध्यक्ष डॉ. शुभदा लोहिया, सचिव गोरख शेंद्रे, कोषाध्यक्ष सुनील जाधव व स्वागत समितीचे सर्व पदाधिकारी यांनी एका संयुक्त प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.
गझल साधना पुरस्कार २०२५
याच उद्घाटन सत्रात ख्यातकीर्त संगीतकार, गायक गझलगंधर्व सुधाकर कदम यांना “गझल साधना पुरस्कार २०२५ अंबाजोगाई” हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह शाल, पुष्पहार व ११ हजार रुपये असे आहे. सुरेश भट यांच्या गझला त्यांनी संगीतबद्ध करून लोकप्रिय केला होत्या. आघाडीचे संगीतकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांनीं अनेक गझला, गीते, भावगीते यांना संगीत दीले असून अनेक नामवंत गायकांनी त्या गायला आहेत. त्यांच्या या सेवेचा पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे.
एकूण १७ मुशायरे व एक परिचर्चा सत्र २०० गझलकार यात भाग घेणार
उद्घाटन सत्रानंतर लगेच मराठी गझल मुशायरे आरंभ होतील. शनिवार १ फेब्रुवारी रोजी ८ मुशायरे व एक गझल परिचर्चा होणार आहे. तर उर्वरित ९ मुशायरे रविवार २ फेब्रुवारी रोजी सकाळ ९.३० वाजता सुरू होतील. हे सर्व सत्र विविध दिवंगत गझलकार यांना समर्पित केले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, गोवा राज्यातून हे सर्व गझलकार आपल्या गझला सादर करणार आहेत. हे संमेलन योगेश्वरी महाविद्यालय येथील नागापूरकर सभागृहात होणार आहेत. संमेलन स्थळाला सुरेश भट गझल नागरी, प्रवेशद्वाराला भाऊसाहेब पाटणकर, व्यासपीठाला सतीश दराडे स्मृती मंच व ग्रंथ दालनाला भगवानराव लोमटे ही नावे दिली आहेत. अशीही माहिती या पत्रकात देण्यात आली आहे.
