खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

अंबाजोगाई :- येथील श्री. खोलेश्वर माध्यमिक विद्यालय येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण संरक्षण विभागांतर्गत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ई-कचरा संकलन व जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
ई-कचरा विषयी प्रमोद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली. ई-कचरा म्हणजे फ्रिज, वॉशिंग मशीन, फॅन, मायक्रोवेव्ह,टि.व्ही, वातानुकूलित यंत्रे, सीडी-डिव्हीडी, प्लेयर, होम थिएटर्स, संगणक, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, हेड फोन, चार्जर , डिजिटल कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा, मोबाईल फोन, चार्जर इत्यादी. तसेच निरुपयोगी अथवा बंद स्थितीमधील कोणीतीही इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील . विद्यार्थ्यांनी अश्या निकामी वस्तू विद्यार्थ्यांनी ई कचरा विद्यालयात जमा करावा असे आवाहन केले . यावेळी पालकांनी विद्यालयाच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून अनंत मसने यांनी ई- कचरा विद्यालयात जमा केला. या प्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे, उपमुख्याध्यापक विवेक जोशी, सूर्यकांत उजगरे, प्रशांत पिंपळे, पालक अनंत मसने, श्रीकांत देशपांडे, विश्वास पत्की, लक्ष्मण काटे, मोरेश्वर देशपांडे उपस्थित होते.
