ताज्या घडामोडी

योगेश्वरी मंदिरात रविवारपासून मार्गशीर्ष महोत्सव

ढोक महाराजांचे कीर्तन, अभंगवाणी, भारुडासह संगीत रजनी व भजन

Spread the love

मार्गशीर्ष पौर्णिमेला भरते यात्रा

अंबाजोगाई :- महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव
रविवारपासून (दि.८ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत मार्गशीर्ष महोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त रामराव ढोक महाराजांचे कीर्तन, अभंगवाणी, संगीत रजनी व भजनासह विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. यंदाही हा महोत्सव साजरा करण्याची तयारी मंदिर परिसरात सुरू आहे. रविवारी (दि.८) सकाळी १० वाजता वर्णी देऊन या मार्गशीर्ष महोत्सवाला प्रारंभ होईल. याच दिवशी सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत नंदेश उमाप यांच्या भारूडाचा कार्यक्रम होईल. सोमवारी (दि.९) सायंकाळी सात वाजता अंजली व नंदिनी गायकवाड यांच्या अभंगवाणीचा कार्यक्रम होईल. मंगळवार व बुधवारी (दि.१० व ११) सायंकाळी ६ ते ८ यावेळेत दोनही दिवस रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांचे कीर्तन होणार आहे.
या शिवाय वाघ्यामुरळी, प्रवचन व भजन, संगीत मैफल होणार आहेत. रविवारी (दि.१५) सकाळी ८ वाजता देवीच्या सभामंडपात होमहवन होऊन दुपारी १२.३० वाजता पूर्णाहुती पडणार आहे. याच दिवशी सायंकाळी मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त योगेश्वरी देवीची पालखी मिरवणूक शहरातील नियोजित मार्गाने निघणार आहे.
या सर्व कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवल समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे, सचिव प्रा. अशोकराव लोमटे, उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, कोशाध्यक्ष शिरीष पांडे, प्रविण दामा यांच्यासह सर्व विश्वस्तांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका