ताज्या घडामोडी

मानव, कृषि व पशुधन हे निसर्गचक्र सकारात्मक असणे गरजेचे – अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे

श्री योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी गणेशोत्सव श्री गणेश व्याख्यानमाला*

Spread the love

अंबाजोगाई (वार्ताहर)

येथील श्री योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी गणेशोत्सव आयोजित श्री गणेश व्याख्यानमालेत शुक्रवार, दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रमुख व्याख्याते कृषि महाविद्यालय लातूर व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लातूरचे अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी भारतीय कृषि व पशुपालन संस्कृती काल, आज आणि उद्या या विषयावर मौलिक व सखोल मार्गदर्शन केले.

नागापूरकर सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी म्हणून अंगदराव कराड हे विचारमंचावर उपस्थित होते. अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी यावेळी सांगितले की, भारतीय कृषि संस्कृतीचा इतिहास वर्णन केला. आधुनिक काळात शहरीकरण व वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शेतीचे विहित क्षेत्र कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली. पशुसंवर्धन ही काळाची गरज असून त्यासाठी पशूंची पैदास, त्यांचे व्यवस्थापन, आरोग्य व त्यापासून अधिक उत्पादकता काढण्यासाठी शेतकरी यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. पुढे बोलताना डॉ.ठोंबरे असेही म्हणाले की, किफायतशीर पशुसंवर्धनासाठी पैदास, आहार, व्यवस्थापन व आरोग्य या चतु:सूत्रीचा योग्य अवलंब पशुपालकांनी करणे अगत्याचे आहे. तसेच शस्त्रज्ञ, पशुपालक, पैदासकार व धोरणकर्ते यांनी एकत्रिपणे चिंतन करून कृषि व पशुसंवर्धन बाबत भविष्यवेध घ्यावा असेही विचार त्यांनी मांडले. या कार्यक्रमासाठी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे, लातूर येथील सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी गिरी, राष्ट्रपती पुरस्कार विजेते सेवानिवृत्त निरीक्षक सय्यद रहेमान यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर, सर्व सन्माननीय सदस्य, गणेश व्याख्यानमाला संयोजन समितीचे समन्वयक प्राचार्य रमण देशपांडे, प्रा.डॉ.शैलजा बरूरे, प्रा.डॉ.गणेश पिंगळे तसेच यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ.डी.ए.चव्हाण, ज्येष्ठ संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ, पंडित उध्दवराव आपेगाववकर, माणिकराव लोमटे, प्रा.एस.पी.कुलकर्णी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती गंगणे यांनी केले.

===

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका