ताज्या घडामोडी
अंबाजोगाई कडकडीत बंद; जरांगे समर्थकांची शहरातून रॅली

अंबाजोगाई -: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या.व इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून जिल्हा बंद ची हाक देण्यात आली. या बंद मध्ये अंबाजोगाई तालुका कडकडीत बंद राहिला.
अंबाजोगाई शहर व परिसरात व्यापारी व अनेक व्यवसायिकांनी आपले व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेऊन आपला बंद ला पाठिंबा दर्शविला. शहरातील मंडी बाजार, मोंढा परिसर व सर्वच भागातील व्यवहार बंद राहिले. आंदोलक समर्थकांनी घोषणा देत शहरातून रॅली काढली. व विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना दिले. शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन जरांगे पाटील यांच्या मागण्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी त्यांच्या समर्थकांनी केली.