मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियानात श्रीराम माध्यमिक विद्यालयाचा तिसरा क्रमांक

अंबाजोगाई (प्रतिनिधी ) : राज्य शासनातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबविला जात आहे. या स्पर्धात्मक अभियानात खाजगी व्यवस्थापनात भारज पाटी येथील श्रीराम माध्यमिक विद्यालयाने अंबाजोगाई तालुक्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. या अभियानाच्या माध्यमातून शाळेने अधिक प्रभावी विस्तार होण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा, शासन अंमलबजावणी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यासोबतच अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य यासह इतर विविध घटक व उद्दिष्टांवर काम करत तालुक्यातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या या यशात सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. लालबहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा कमलबाई शिंदे, सचिव दशरथ शिंदे, संचालक मंडळाने मुख्याध्यापिका नीलप्रभा ढाणे, सर्व कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले