जिजाई विद्यालयात क्रीडा महोत्सवास प्रारंभ

अंबाजोगाई (प्रतिनिधी ) तालुक्यानील वाघाळा परिसरातील जिजाई इंग्लीश स्कूल मध्ये बुधवारी जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक शिवकुमार निर्मळे यांच्या हस्ते क्रीडाज्योत पेटऊन क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ उत्साहात करण्यात आला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाचालक रमेशराव कदम होते . यावेळी व्यासपीठावर सचिव सुरेश कदम , प्राचार्या शीतल मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती .
या प्रसंगी बोलताना शिवकुमार निर्मळे म्हणाले , दररोज एक तास कोणताही खेळ खेळला पाहिजे . त्यामुळे शारीरिक विकास होतो . खेळामुळे व्यायामही होतो .
रमेशराव कदम यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या .
सुरुवातीला सचिव सुरेश कदम यांनी प्रास्ताविकास शाळेच्या विकसा विषयी माहिती दिली . पाहुण्यांचे स्वागत रुपाली काकडे , सुशांत कदम यांनी केले .यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिमा गुरसुळकर यांनी केले शेवटी अमराजा नरारे यांनी सर्वांचे आभार मानले .
त्यानंतर क्रीडाज्योत प्रज्वलीत करून शिवकुमार निर्मळे यांनी श्रीफळ वाढऊन स्पोर्टस मिटचे उद्घाटन केले . या वेळी शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या . कार्यक्रमासाठी जयश्री गायकवाड, विद्या समुद्रे, रुबीना शेख, योगेश्वरी मगर , स्वाती क्षीरसागर यांनी सहकार्य केले .