ताज्या घडामोडी

मेट्रोसिटीच्या धर्तीवर अंबाजोगाईचा विकास करण्याचा संकल्प – आ. नमिता मुंदडा

योगेश्वरी मंदिरात भूमीपूजन

Spread the love

अंबाजोगाई -: आगामी काळात मेट्रोसिटीच्या धर्तीवर अंबाजोगाई शहराचा विकास करण्याचा संकल्प आमदार नमिता मुंदडा यांनी येथे केला. त्या दृष्टीकोनातून काही कामे सुरू करण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या.
अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरात विविध सुख, सोयींच्या कामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. त्यातले २ कोटी ५० लाख रुपयाच्या पहिल्या टप्यातील निधीतील कामाचे भूमीपूजन आमदार मुंदडा यांच्या हस्ते रविवारी झाले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी तहसीलदार विलास तरंगे हे होते. भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी, समितीचे सचिव अशोक लोमटे, युवा नेते अक्षय मुंदडा, समितीचे विश्वस्त शिरीष पांडे, कमलाकर चौसाळकर, गिरधारीलाल भराडिया, संजय गंभीरे, कमलाकर कोपले, नारायण केंद्रे, मकरंद सोनेसांगवीकर, संजय लोणीकर, दिनेश परदेशी, उल्हास पांडे, बालासाहेब दोडतले, महादेव मस्के, सारंग पुजारी, गौरी जोशी, श्रीराम देशपांडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
अंबाजोगाई शहर परिसरातील जुनी मंदिरे व पुरातन लेण्यासाठी निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला. रस्ते विकासाची कामे प्रगतीपथावर आहेत. शहरासाठी महत्वाची २०६ कोटी रूपयांची पाणी पुरवठा योजनेचे काम येत्या आक्टोबर अखेरपर्यंत सुरू होईल. ती पूर्ण झाल्यास नागरीकांना किमान दोन दिवसाला पाणी पुरवठा होईल अशी माहितीही आमदार मुंदडा यांनी दिली.
भविष्यात पाच कोटीच काय तर विकास कामासाठी १०० कोटी लागले तरी खेचुन आणण्याची क्षमता आमदार मुंदडा यांच्यात असल्याचे त्यांनी राम कुलकर्णी यांनी सांगितले.
अक्षय मुंदडा म्हणाले, की सामान्य माणुस हाच विकासाचा केंद्रबिंदु समजून मोठ्या प्रमाणावर निधी इथे आणला. मात्र विरोधक बिनबुडाचे आरोप करून समाज माध्यमावर फेक अकाऊंट काढून बदनामी करतात. यापेक्षा त्यांनी समोर येवुन चर्चा करावी असा सडकून समाचारही त्यांनी विरोधकांचा घेतला.
यावेळी अशोक लोमटे व विलास तरंगे यांचीही भाषणे झाली. सारंग पुजारी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रकाश बोरगावकर यांनी केले. बालाजी शेरेकर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका