ताज्या घडामोडी

भिमशक्तीच्या बीड जिल्हा प्रसिध्दीप्रमुखपदी सुनिल धिमधिमे यांची नियुक्ती

Spread the love

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी धर्मनिरपेक्षपणे लढणारी संघटना म्हणून भिमशक्तीची सर्वदूर ओळख आहे. भिमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष खासदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देवून भिमशक्तीच्या बीड जिल्हा प्रसिध्दीप्रमुखपदी सुनिल धिमधिमे यांची नियुक्ती केली आहे.

 

येथील आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू कार्यकर्ते सुनिल धिमधिमे (संपादक, साप्ताहिक महाराष्ट्राची शान) हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. चळवळी मध्ये त्यांचे चांगले योगदान आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून, गरजूंना मदत करून त्यांनी प्रबोधनाचा वारसा जोपासला आहे. बांधिलकी जोपासत गोरगरीब, गरजू लोकांना दवाखाना असो, तहसील असो किंवा पोलिस स्टेशन येथे त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धिमधिमे हे कायमच जनसेवा करीत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन भिमशक्तीचे मराठवाडा संघटक चंद्रकांत खरात, मराठवाडा उपाध्यक्ष हरिश्चंद्र विद्यागर, बीड जिल्हाध्यक्ष डॉ.अमरेंद्र विद्यासागर, कार्याध्यक्ष भिमराव सरवदे यांच्या हस्ते सुनिल धिमधिमे यांना रविवार, दिनांक २२ सप्टेंबर रोजी नियुक्तीपत्र देवून त्यांची भिमशक्तीच्या बीड जिल्हा प्रसिध्दीप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर नुतन जिल्हा प्रसिध्दीप्रमुख धिमधिमे यांनी कोळकानडी येथे ‘संविधान’ या त्यांच्या निवासस्थानी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे मराठवाडा संघटक चंद्रकांत खरात, कार्याध्यक्ष भिमराव सरवदे यांचा ह्रद्य सत्कार केला. यावेळी बीड जिल्हाध्यक्ष डॉ.अमरेंद्र विद्यासागर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भिमशक्तीचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव बनसोडे (धाराशिव), युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंभुराजे देशमुख, भिमशक्तीचे मराठवाडा उपाध्यक्ष हरिश्चंद्र विद्यागर, भिमशक्तीचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ मंजुळे हे उपस्थित होते. तर भिमशक्तीच्या बीड जिल्हा प्रसिध्दीप्रमुखपदी सुनिल धिमधिमे यांची निवड करण्यात आल्याबद्दल कुणाल इंगळे, ढवळे साहेब (लातूर), मार्गदर्शक बी.एम.बनसोडे, तात्याराव वाघमारे (धाराशिव), अल्लाउद्दीन शेख (केज), भिमशक्तीचे केज शहराध्यक्ष शिवमूर्ती हजारे, धीमंत राष्ट्रपाल, सरपंच ज्योतिर्लिंग नाना गुजर, उद्योजक रघुवीर देशमुख, भारत गाढवे, हरिश्चंद्र ढगे, अक्षय सुरवसे, आकाश मुंडे (परळी वैजनाथ), महेंद्र धिमधिमे (उपसंपादक, साप्ताहिक महाराष्ट्राची शान), कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे परळी तालुकाध्यक्ष दिलीप भालेराव, वैजेनाथ काळे, सुमित आवाडे, सामाजिक कार्यकर्ते संजय साळवे यांच्यासह मित्र, परिवार व नातेवाईक यांच्यासह धिमधिमे यांच्या निवडीचे बीड जिल्ह्यातून स्वागत होत आहे.

 

भिमशक्तीचा विचार सर्वदूर पोहोंचवणार :

खासदार तथा राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी बीड जिल्हा प्रसिध्दीप्रमुखपदी माझी नियुक्ती करून मोठी जबाबदारी सोपविली आहे. याचा मी स्विकार केला आहे. नियुक्ती करणाऱ्यांच्या विश्वासाला कदापीही तडा जाऊ देणार नाही. पुढील काळात संघटनेचे सर्व मार्गदर्शक, ज्येष्ठ, आजी – माजी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन भिमशक्तीचा विचार सर्वदूर पोहोंचवणार आहे. -सुनिल धिमधिमे (भिमशक्ती, प्रसिध्दीप्रमुख, बीड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका