मांजराला भरतीचे वेध! ९२ टक्के पाणीसाठा; कधीही दरवाजे उघडण्याची शक्यता
मांजरा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अंबाजोगाई -: बीड, लातुर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात ९२ टक्क्यांहून अधिक पाणी साठि जमा झाला असून नदी पात्रात उन पाण्याचा मोठा विसर्ग धरणात जमा होतो आहे. अशा परिस्थितीत मांजरा आणि निम्न तेरणा धरणाचे दरवाजे कधीही उघडू शकतात तेंव्हा नागरिकांना सतर्क रहावे असा इशारा मांजरा धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
या संदर्भात मांजरा धरणावर नियंत्रण ठेवणा-या कार्यकारी अभियंता, लातुर पाटबंधारे विभाग क्र. १, या कार्यालयाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, मांजरा प्रकल्पाचा पाणीसाठा आज २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ९२.४३ टक्के इतका झाला आहे तसेच निम्न तेरणा प्रकल्पाचा पाणीसाठा ९५.४० टक्के भरला आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील कॅचमेंट क्षेत्रातील पर्जन्यमान विचारात घेता प्रकल्पामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून प्रकल्प कधीही त्याच्या निर्धारीत पातळीस भरण्याची शक्यता आहे. तथापि प्रकल्पाच्या अधोबाजूस असलेल्या बीजसव्दारे सुरळीतपणे पूर नियंत्रण राबविणेसाठी व मोठ्या प्रकल्पात अचानक येणारी आवक समावून घेणे करीता आवश्यक वॉटर पॉकेट तयार करून ठेवणे आव्ययक आहे. उपरोक्त सर्व बाबीचा विचार करता क्षेत्रीय परिस्थितीनुसार मांजरा व निम्न तेरणा प्रकल्पांची व्दार परिचालन कार्यवाही करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता, लातूर पाटबंधारे विभाग क्र. १ लातूर यांनी कळविले आहे.
- करीता मांजरा व निम्न तेरणा नदीकाठच्या गावाना शेतक-यांना नदीकाठी वस्ती करून राहिलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. करिता आपले नैसर्गिक आपत्तीचे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवून दर तासानी पडणा-या पावसाबाबत तसेच काही हानी झाल्यास त्याबाबत संदेश या कार्यालयास द्यावा व सदर कालावधीत जिल्ह्यातील सर्व शेतकरी नागरिक यांनी पुढीलप्रमाणे खबरदारी घ्यावी. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली पाण्याच्या स्रोताजवळ विद्युत खांचाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वतः सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा. जलसाठ्याजवळ नदीजवळ जाऊ नये, आपल्या मुलांना जलसाठ्यावर / नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये, शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विध्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे. पुलावरून नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किवा चाहनासह पूल / नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जाऊ नये. पाउस सुरु असताना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते. तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी. अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत.