ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांनो यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत आणि कसून अभ्यासाशिवाय पर्याय नाही:-इंजि नवनाथ शिंदे

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या २९व्या वर्धापन दिनानिमित्त जी प शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहीत्याचे वाटप

Spread the love

अंबाजोगाई(प्रतिनिधी):- भरकटत चाललेला चर्मकार समाज बांधवाना योग्य दिशा देण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाची स्थापना झाल्याचे मत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा उपाध्यक्ष इंजि नवनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. चर्मकार महासंघाच्या २९व्या वर्धापन दिनानिमित्त अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी महासंघाचे राहुल साळुंके, तालुकाध्यक्ष रवी वाघमारे, बाळू परदेशी,अमोल कांबळे यांच्यासह मुख्याध्यापक राठोड सर, उपसरपंच सुधाकर इंगळे, शालेय शिक्षण समितीचे लक्ष्मण पतंगे, विकास मस्के हे उपस्थित होते.
या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राहुल साळुंके यांनी केले. यावेळी
त्यांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघा विषयीची कल्पना थोडक्यात सांगितली. राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री बबनराव घोलप यांनी २४सप्टेंबर १९९५ साली राष्ट्रीय चर्मकार महासंघाची निर्मिती केली. याद्वारे त्यांनी राज्यातील चर्मकार समाजातील असंख्य समाज बांधवांचे विविध प्रकारच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याचे राहुल साळुंके यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इंजि नवनाथ शिंदे यांनी अनेक बाबींचा उलगडा केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक चळवळीस प्रेरित होऊन माजी मंत्री बबनराव घोलप यांनी विखुरलेल्या चर्मकार समाजास एकसंघ करण्यासाठी प्रयत्न केले. ते प्रयत्न आज यशस्वी होतांना दिसत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. संघटनेच्या वतीने वेळोवेळी अनेक विधायक उपक्रम राबविले जातात. असाच एक उपक्रम म्हणजेच गरीब व गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य पुरवणे हा होय.आज ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील जवळपास अडीचशे विद्यार्थ्याना मोफत पॅड, रजिस्टर, कंपास, पेने वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नवनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांसोबत हीतगुज साधले. याच गावातील सोनवलकर सरांनी मला प्राथमिक शिक्षण दिले आहे. आणि त्याच गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य देतांना मन अतिशय भारावून गेल्याचे शिंदे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल आणि कसून अभ्यास आणि कठोर मेहनतीस पर्याय नसल्याचे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना इंजि नवनाथ शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पदाधिकारी व शाळेतील शिक्षक लगस्कर, निकम सर, गडकर सर, बिडवे सर,क्षीरसागर सर, होट्टे मॅडम, गडदे सर, वनवे सर त्याचबरोबर शालेय पोषण आहार समितीचे अरविंद सुरवसे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गडकर सरांनी तर आभार बिडवे सरांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका