ताज्या घडामोडी

आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा

Spread the love

परळी वैजनाथ।दिनांक २८।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली

आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाला यश मिळवून देण्यासाठी सर्वांनी जोमाने व एकजूटीने कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत केल्या.

जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

विधानसभा मतदारसंघ निहाय बैठकांबरोबरच आ. पंकजाताई मुंडे यांनी जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्यांचा जागेवरच निपटारा केला. जिल्हयातून तसेच राज्याच्या विविध भागातून अनेक नागरिक व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्या कानावर घातल्या. या सर्वांची गाऱ्हाणी ऐकून घेत त्यांचे प्रश्न यावेळी आ. पंकजाताईंनी मार्गी लावले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका