प्रणिता मस्के यांना पीएचडी प्रदान

बीड:
बीड येथील रहिवाशी प्रणिता लक्ष्मणराव मस्के यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने “डाॅ.सदानंद मोरे यांच्या साहित्याचा विवेचक अभ्यास” या विषयावर पीएचडी प्रदान केली आहे. त्यांना मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रणिता लक्ष्मणराव मस्के यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात “डाॅ.सदानंद मोरे यांच्या साहित्याचा विवेचक अभ्यास” या विषयाचा चिकित्सक अभ्यास करून प्रबंध सादर केला. यासाठी सिध्देश्वर महाविद्यालय माजलगाव जि.बीड येथील प्राचार्य डाॅ. कमलाकर कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. डाॅ.कमलाकर कांबळे यांचे याआधी पंधरा विद्यार्थ्यांना पीएचडीचे मार्गदर्शन लाभले हे विशेष मानले जात आहे. प्रणिता लक्ष्मणराव मस्के यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.