महाविकास आघाडीच्या १७० जागा निवडून येतील – आ.रोहित पवार
अंबाजोगाईच्या सभेत व्यक्त केला विश्वास अंबाजोगाई

महाराष्ट्रातून महायुती हद्दपार होईल.व महाविकास आघाडीच्या १७० जागा निवडून येतील. व आमचेच सरकार सत्तेत येईल.असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे युवा नेते आ.रोहित पवार यांनी व्यक्त केला.
अंबाजोगाई येथे शनिवारी सायंकाळी केज विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारासाठी आ. रोहित पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. यावेळी मंचावर खा.बजरंग सोनवणे,पृथ्वीराज साठे,उषा दराडे,प्रा. संगीता ठोंबरे,राजकिशोर मोदी,डॉ.नरेंद्र काळे, अंजली घाडगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की महायुती जाती धर्मात भांडणे लावण्याचे काम करीत आहे. सोयाबीन भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. केवळ घोषणा करण्यात सरकार गुंग आहे. बेरोजगारी,स्पर्धा परीक्षेतील पेपर फुटी यामुळे युवकांचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे. ही सर्व सरकारची विस्कटलेली घडी महाविकास आघाडीचे सरकार दुरुस्त करणार आहे. यासाठी सामान्य कुटुंबातील साठे यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी खा.बजरंग सोनवणे यांनी मुंदडा कुटुंबावर जोरदार टीका केली. प्रा.संगीता ठोंबरे,राजकिशोर मोदी,उषा दराडे पृथ्वीराज साठे यांची भाषणे झाली.